घाईत असलेल्या रणवीरला एका वृद्ध महिलेने थांबवलं, पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:32 IST2025-08-07T13:31:50+5:302025-08-07T13:32:20+5:30
रणवीर सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एका वृद्ध महिलेने रणवीरला अचानक थांबवलं. पुढे काय घडलं बघा

घाईत असलेल्या रणवीरला एका वृद्ध महिलेने थांबवलं, पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगच्या दिलदार आणि दिलखुलास स्वभावाची उदाहरणं आपण अनेकदा पाहत असतो. सध्या रणवीरचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर एका वृद्ध महिलेला अत्यंत प्रेमाने भेटताना दिसतो. तो तिच्या पायाला हात लावून नमस्कार करतो, तिचा हात प्रेमाने हातात घेतो आणि अगदी नम्रपणे तिच्याशी संवाद साधतो. हा सुखद क्षण मुंबईतील एका डबिंग स्टुडिओबाहेर घडला आहे.
रणवीरचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिसतं की, रणवीर सिंग डबिंग संपवून बाहेर येत असताना ही महिला त्याला भेटते. दोघांमध्ये काही क्षण गप्पा होतात. त्या दरम्यान रणवीरची त्या महिलेसोबत असलेली आदरयुक्त वागणूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. रणवीर घाईत दिसत असला तरीही त्याने त्या महिलेचं म्हणणं ऐकून घेतलं. याशिवाय तिचा हात हातात घेऊन अत्यंत प्रेमाने तिच्याशी संवाद साधला. रणवीरला भेटून त्या महिलेला किती आनंद झाला, हे दिसत होतं.
आगामी 'धुरंधर' सिनेमात रणवीरने जो लूक केलाय सध्या त्याच लूकमध्ये तो सगळीकडे वावरताना दिसतोय. वाढलेली दाढी, डोळ्यावर चष्मा, लांब केस असा रणवीरचा लूक सर्वांना आवडत आहे. रणवीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यावर अनेकांनी रणवीरचं भरभरून कौतुक केलं आहे. “खरा स्टार तोच ज्याच्याकडे नम्रता आहे”, “अजूनही संस्कार जपणारा अभिनेता” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. रणवीरच्या या साधेपणामुळे अनेक जणांनी त्याच्या स्वभावाची प्रशंसा केली. दरम्यान, रणवीर सिंगचा आगामी 'धुरंधर' सिनेमा ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.