Throwback Video : सुशांतसमोर अंकितासोबत फ्लर्ट करत होता रणवीर सिंह, बघून भडकला होता अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 15:22 IST2021-08-04T15:19:39+5:302021-08-04T15:22:19+5:30
सुशांत सिंह राजपूत यावेळी रणवीर सिंह याला हे म्हणतो की, रणवीर तू माझा इंटरव्ह्यू खराब करतो. तेच अंकिताही रणवीरला बघून अवाक् होते.

Throwback Video : सुशांतसमोर अंकितासोबत फ्लर्ट करत होता रणवीर सिंह, बघून भडकला होता अभिनेता
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचं नातं सर्वांनाच माहीत आहे. अंकितासोबत सुशांत मोठ्या दमदार अंदाजात चालत होता. त्यांना विश्वास होता की, ते एक चांगलं आयुष्य जगत आहेत. पण दोघे वेगळे झाल्यावर सुशांत पूर्णपणे बदलला. अंकिताने नातं वाचवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण तसं होऊ शकलं नाही. आज आम्ही तुम्हाला एक असा व्हिडीओ दाखवतोय ज्यात दोघेही सोबत आहेत. हा एका अवॉर्ड शोमधील व्हिडीओ आहे. इथे दोघेही सोबत पोहोचले होते. यादरम्यान अंकिता आणि सुंशात मीडियाला मुलाखत देत होते. अशात रणवीर सिंह तिथे येतो आणि दोघांसोबत मस्ती करू लागतो.
सुशांत सिंह राजपूत यावेळी रणवीर सिंह याला हे म्हणतो की, रणवीर तू माझा इंटरव्ह्यू खराब करतो. तेच अंकिताही रणवीरला बघून अवाक् होते. पण रणवीर सिंह अंकिताला म्हणतो की, 'आता तू माझ्यासोबत असं करणार'. रणवीर सिंह आणि सुशांत चांगले मित्र होते. ते या व्हिडीओत बघायला मिळतं. सुशांत या व्हिडीओ अंकिताबाबत प्रोटेक्टिव दिसत आहे. यावरून त्याचं तिच्यावर किती प्रेम होतं हे दिसतं. पण जेव्हा रणवीर सिंह अंकितासोबत फ्लर्ट करू लागतो तेव्हा सुशांत रणवीरला जाण्यासाठी सांगतो.
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचं नातं फार वेगळ्या प्रकारचं होतं. जे बघायला सुंदर होतं. या दोघांनी मिळून ३ वर्ष पवित्र रिश्ता या मालिकेत काम केलं होतं. यात दोघांची जोडी लोकप्रिय झाली आणि दोघांनाही फेम मिळालं. याच मालिकेतून नंतर सुशांत बॉलिवूडमध्ये आला. त्याने 'काय पो छे' मध्ये डेब्यू केलं होतं.