पायाचे तळवे रक्ताने माखले होते, तरीही दीपिका नाचत राहिली...! रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 17:55 IST2021-02-28T17:53:54+5:302021-02-28T17:55:11+5:30
आज ती जी काही आहे, त्यामागचे तिचे अपार कष्ट आहेत. तिची योग्यता आहे. असे या व्हिडीओत रणवीर सांगतोय.

पायाचे तळवे रक्ताने माखले होते, तरीही दीपिका नाचत राहिली...! रणवीर सिंगचा व्हिडीओ व्हायरल
दीपिका पादुकोणवररणवीर सिंग किती प्रेम करतो, हे जगजाहिर आहे. दीपिकावरचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी रणवीर सोडत नाही. दीपिकाच्या प्रत्येक पोस्टवर त्याची कमेंट दिसते आणि दिसतेच. अलीकडे दीपिकाला ड्रग्जप्रकरणाचा सामना करावा लागला. एनसीबीच्या चौकशीलाही तिला सामोरे जावे लागले. या संपूर्ण काळात दीपवीरला अनेक कटु अनुभव सहन करावे लागले. टीका सहन करावी लागली. सोशल मीडियावर त्यांनी ट्रोलिंगही सहन केले. दीपवीरने यावर मौन बाळगणे पसंत केले होते. पण आता दीर्घकाळानंतर अप्रत्यक्ष का होईना रणवीरने या ट्रोलर्सवर पलटवार केला आहे. दीपिका आज जी काही आहे, ती तिच्या योग्यतेमुळे, असे त्याने सुनावले आहे.
रणवीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात रणवीर ‘रामलीला’च्या डान्स सीक्वेन्सबद्दल सांगातये. ‘रामलीला’चे गाणे शूट करताना दीपिकाने प्रचंड मेहनत घेतली. तिच्या दोन्ही पायाचे तळवे अक्षरश: सोलले होते. अक्षरश: त्यातून रक्त निघत होते. पण असे असतानाही तिने हे गाणे शूट केले, आपले काम पूर्ण केले. गाण्यात ती सेमी सर्कलमध्ये फिरत होती. टेक पूर्ण झाल्यावर त्याठिकाणी रक्ताचे अर्धवर्तूळ बनले होते. आज ती जी काही आहे, त्यामागचे तिचे अपार कष्ट आहेत. तिची योग्यता आहे. असे या व्हिडीओत रणवीर सांगतोय.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर रणवीर व दीपिका लवकरच ‘83’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. याशिवाय रणवीरचा ‘सर्कस’ हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायवे तर यावर्षी दीपिकाचे एक-दोन नव्हे तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी दीपिका बाहुबली फेम प्रभाससोबतही दिसणार आहे. ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याव्यतिरिक्त दीपिका, शाहरुख खानसोबत ‘पठान’ या चित्रपटात धमाका करणार आहे. याशिवाय शकुन बत्राचा एक सिनेमाही तिने हातावेगळा केला आहे.