होणाऱ्या बाळासाठी रणवीर सिंगचा मोठा निर्णय, दीपिकानंतर अभिनेताही कामातून घेणार ब्रेक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 13:13 IST2024-03-20T13:13:29+5:302024-03-20T13:13:59+5:30
बाबा झाल्यानंतर रणवीर कामातून ब्रेक घेत पॅटर्निटी लीव्हवर जाणार असल्याचं बोललं जात आहे.

होणाऱ्या बाळासाठी रणवीर सिंगचा मोठा निर्णय, दीपिकानंतर अभिनेताही कामातून घेणार ब्रेक?
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. रणवीर आणि दीपिका लवकरच आईबाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. रणवीर-दीपिका नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. बाबा झाल्यानंतर रणवीर कामातून ब्रेक घेत पॅटर्निटी लीव्हवर जाणार असल्याचंही बोललं जात आहे.
झूमने दिलेल्या रिपोर्टनुसार, दीपिकाने तिच्या सगळ्या वर्क कमिटमेंट पूर्ण केल्या आहेत. पण, रणवीरने अनेक सिनेमे साइन केल्यामुळे तो सध्या व्यग्र आहे. त्यामुळे त्याने पॅटर्निटी लीव्हवर जाण्याचा कोणताच प्लॅन केला नव्हता. पण, आता बैजू बाजवामुळे त्याला वेळ मिळणार आहे. 'डॉन ३' आणि 'शक्तिमान' या सिनेमाच्या शूटिंगला वेळ असल्याने या काळात रणवीर ब्रेक घेण्याचा विचार करत आहे. यादरम्यान कोणताही नवीन प्रोजेक्ट न घेण्याचा निर्णय रणवीरने घेतला आहे. त्यामुळे दीपिका आणि बाळाबरोबर त्याला वेळ घालवता येईल.
दीपिका आणि रणवीरने २०१८मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर ६ वर्षांनी आता ते आईबाबा होणार आहेत. सप्टेंबरमध्ये दीपिका त्यांच्या पहिला मुलाला जन्म देणार आहे. दीपिका-रणवीर आईबाबा होणार असल्यामुळे चाहतेही खूश आहेत.