नवरा असावा तर असा! गरोदर दीपिकाला चाहत्यांनी घेरलं अन्...; रणवीरच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 11:20 IST2024-03-01T11:18:36+5:302024-03-01T11:20:56+5:30

Deepika-Ranveer : गुडन्यूज दिल्यानंतर दीपिका-रणवीर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, अभिनेत्याच्या कृतीने वेधलं लक्ष

ranveer singh protest pregnant deepika padukone in crowd anand ambani pre wedding function video viral | नवरा असावा तर असा! गरोदर दीपिकाला चाहत्यांनी घेरलं अन्...; रणवीरच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

नवरा असावा तर असा! गरोदर दीपिकाला चाहत्यांनी घेरलं अन्...; रणवीरच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

बॉलिवूडमधील फेव्हरेट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण लवकरच आईबाबा होणार आहेत. त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दीपिका-रणवीरने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. त्यानंतर पहिल्यांदाच दीपवीर कॅमेऱ्यासमोर आले आहेत. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

सध्या अंबानींच्या घरी लग्नाची धामधुम सुरू आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. गुजरातमध्ये १ ते ३ मार्चदरम्यान त्यांचं प्रीवेडिंग फंक्शन असणार आहे. यासाठी अनेक सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. दीपिका आणि रणवीरलाही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्रीवेडिंग सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे. यासाठी दीपवीर गुजरातला पोहोचले आहेत. यादरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

प्रेग्नन्सीच्या बातमीनंतर दीपिका आणि रणवीर पहिल्यांदाच पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. यावेळी दीपिका-रणवीरला चाहत्यांनी घेरल्याचं दिसून आलं. चाहत्यांच्या गर्दीत रणवीर दीपिकाचं संरक्षण करताना दिसून आला. तिला कोणाचा धक्का लागू नये याची पूरेपूर काळजी रणवीर घेताना व्हिडिओतही रणवीर दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी रणवीरचं कौतुक करत आहेत. 

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने २०१८ साली विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर ६ वर्षांनी रणवीर-दीपिकाला आता नव्या पाहुण्याची चाहुल लागली आहे. नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 

Web Title: ranveer singh protest pregnant deepika padukone in crowd anand ambani pre wedding function video viral