Ranveer Singh : गोविंदासमोर रणवीरचा साष्टांग दंडवत, अभिनेत्याच्या डोळ्यात तरळले अश्रू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 23:28 IST2022-01-02T23:25:42+5:302022-01-02T23:28:17+5:30
Ranveer Singh : गोविंदाने या शोमध्ये रणवीरसोबत धमाल केली, हिरो नंबर 1 पासून ते राजाबाबूपर्यंत सुपरहीट चित्रपटांतील गाण्यावर रणवीरसोबत डान्स केला. गोविंदाने शोसाठी एंट्री केल्यावर रणवीरने लाडक्या अभिनेत्याला जादू की झप्पी दिली.

Ranveer Singh : गोविंदासमोर रणवीरचा साष्टांग दंडवत, अभिनेत्याच्या डोळ्यात तरळले अश्रू
मुंबई - बॉलिवूडचा गली बॉय रणवीर सिंग आणि बॉलिवूडचा हिरो नंबर 1 गोविंदा यांच्या भेटीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. रणवीरचं गोविंदावर असलेलं प्रेम आणि चाहत्याच्या रुपात गोविंदाची झालेली भेट हा विलक्षण सीन आहे. कारण, रणवीर गोविंदाचा जबरा फॅन असून तो गोविंदाला देव मानते. आज मै मेरे भगवान से मिला, असे म्हणत रणवीरने गोविंदाचे स्वागत केले. रणवीरच्या ‘द बिग पिक्चर’ या शोमध्ये गोविंदाने हजेरी लावली होती.
गोविंदाने या शोमध्ये रणवीरसोबत धमाल केली, हिरो नंबर 1 पासून ते राजाबाबूपर्यंत सुपरहीट चित्रपटांतील गाण्यावर रणवीरसोबत डान्स केला. गोविंदाने शोसाठी एंट्री केल्यावर रणवीरने लाडक्या अभिनेत्याला जादू की झप्पी दिली. त्यावेळी, रणवीर भावूक झाला होता, त्याच्य डोळ्यात अश्रू तरळल्याचं दिसून आलं. त्यानंतर, रणवीरने गोविंदाला शोमधील ऑडियन्सची भेट घालून दिली. गोविंदाला पाहून चाहतेही सैराट झाले होते.
'आज यहां इस मंच पर, इस शुभ दिन पर और इस शुभ अवसर पर मेरे भगवान खुद यहां पर आने वाले हैं। द वन एंड ऑनली, हीरो नंबर 1 गोविंदा।...' अशा शब्दात रणवीरसिंहने गोविंदाचे जल्लोषात स्वागत केले. गोविंदाची स्टेजवर एंट्री होताच, रणवीरसिंगने आपल्या लाडक्या अभिनेत्यासमोर सांष्टांग दंडवतच घेतला. तत्पूर्वी स्टेजवर येण्याअगोदर गोविंदाची भेट रणवीरसाठी अतिशय भावूक ठरली.