Ranveer Singh Photoshoot: रणवीर सिंगनं मॅगझिनसाठी केलं ‘बवाली’ फोटोशूट, इंटरनेटवर आला मीम्सचा पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 10:32 IST2022-07-22T10:26:15+5:302022-07-22T10:32:51+5:30

Ranveer Singh Nude Photoshoot, Memes viral : होय, एका अमेरिकन मॅगझिनसाठी रणवीर सिं चक्क न्यूड झाला. त्याच्या न्यूड फोटोशूटचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत आणि ते पाहून सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. 

ranveer singh nude photoshoot for magazine memes viral | Ranveer Singh Photoshoot: रणवीर सिंगनं मॅगझिनसाठी केलं ‘बवाली’ फोटोशूट, इंटरनेटवर आला मीम्सचा पूर

Ranveer Singh Photoshoot: रणवीर सिंगनं मॅगझिनसाठी केलं ‘बवाली’ फोटोशूट, इंटरनेटवर आला मीम्सचा पूर

Ranveer Singh Nude Photoshoot, Memes viral :  रणवीर सिंग  (Ranveer Singh) सतत चर्चेत असतो. त्याच्या अदाकारीपेक्षाही त्याच्या अतरंगी फॅशनची चर्चा जास्त होताना दिसतेय. अनेकदा तो त्याच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोलही होतो. पण लोकांची पर्वा करणाऱ्यांपैकी रणवीर नाहीच. आता तर त्याने असं काही केलं की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. होय, एका अमेरिकन मॅगझिनसाठी तो चक्क न्यूड झाला. त्याने न्यूड होत या मॅगझिनसाठी फोटोशूट केलं. त्याच्या न्यूड फोटोशूटचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत आणि ते पाहून सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.  त्याच्या या न्यूड फोटोशूटवरचे अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर एक ना अनेक भन्नाट मीम्सचा पूर आला आहे. यापैकी काही मीम्स चांगलेच मजेशीर आहेत.

रणवीरचं हे न्यूड फोटोशूट पाहून चाहत्यांना जणू 440 व्होल्टचा धक्का बसला आहे. रणवीर असं काही करू शकतो, याची कल्पनाही चाहत्यांनी कधी केली नव्हती. त्यामुळेच त्याच्या फोटोशूटवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

अगदी तुझ्या बायकोने यासाठी परवानगी दिली तरी कशी? असा सवाल एका युजरने केला आहे. काहींनी त्याला ट्रोल केलं आहे तर काहींनी त्याचा बचाव केला आहे.

खुद्द रणवीरचं या न्यूड फोटोशूटबद्दल काय म्हणणं आहे तर त्याला नेहमीप्रमाणे लोक काय म्हणतील याची पर्वा मुळीच नाही. यात काहीही वाईट नाही. कारण या फोटोत तुम्ही फक्त माझा आत्मा पाहू शकता, असं त्याने म्हटलं आहे. 
आपल्या या बोल्ड फोटोशूटचं रणवीरने समर्थन केलं आहे. ‘नेकेड फोटोशूट करणं माझ्यासाठी फार कठीण नाहीये.  या फोटोंमधून तुम्ही फक्त माझी आत्मा बघू शकता. मी हजारो लोकांसमोर नेकेड होऊ शकतो. माझ्यामुळे ते अस्वस्थ होतील. मात्र मला काहीच अडचण नाहीय,’असं तो म्हणाला.यावरून अभिनेत्याला आपल्या या फोटोशूटबाबत प्रचंड आत्मविश्वास असल्याचं दिसून येत आहे.
 

Web Title: ranveer singh nude photoshoot for magazine memes viral