Ranveer Sing New Car: रणवीर विना इंश्योरन्स 4 कोटींची गाडी चालवतोय? सोशल मीडियावर सुरू झाला वाद; सत्य काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 14:51 IST2022-10-18T14:50:35+5:302022-10-18T14:51:26+5:30
रणवीर सिंह नुकताच त्याच्या आलिशान अॅस्टन मार्टिन कारसह मुंबई विमानतळावर दिसला होता.

Ranveer Sing New Car: रणवीर विना इंश्योरन्स 4 कोटींची गाडी चालवतोय? सोशल मीडियावर सुरू झाला वाद; सत्य काय..?
Ranveer Sing New Car: बॉलिवूडचा सूपरस्टार रणवीर सिंग त्याच्या हटके लूकमुळे नेहमी चर्चेत असतो. रणवीरला वेगवेगळे कपडे घालायला आवडतात. फार कमी लोकांना माहितीये की, जगावेगळ्या कपड्यांशिवाय रणवीरला गाड्यांचाही शौक आहे. रणवीरकडे ऑडी, मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी, जग्वार आणि लँड रोव्हरसारख्या कोट्यवधी रुपयांच्या आलिशान गाड्या आहेत.
रणवीरच्या कारवरून वाद
अलीकडेच रणवीर मुंबई विमानतळावर एका नवीन आलिशान गाडीसोबत दिसला. त्याच्या या नवीन कारने अनेकांचे लक्ष वेधले. रणवीरने आता एक्वामेरीन रंगाची 'अॅस्टन मार्टिन' गाडी घेतली आहे. पण, त्याच्या या नवीन गाडीमुळे सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. रणवीर वैध विम्याशिवाय त्याची 3.9 कोटींची कार चालवत आहे, असा दावा एका ट्विटर युजरने केला आहे.
रणवीरने विमा काढलाय
रणवीरच्या या नवीन कारवर 11 हजार रुपयांचे चालानही असल्याचे त्या युजरने म्हटले आहे. मुंबई पोलिसांनीही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या युजरच्या ट्विटला उत्तर देत हे प्रकरण वाहतूक पोलिसांकडे सोपवण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, काही मीडिया रिपोर्टनुसार, रणवीरने त्याच्या गाडीचा विमा काढलेला आहे.