किस बाई किस! रणवीर-दीपिकाचं Kiss करु नका Miss, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 13:43 IST2023-07-21T13:40:10+5:302023-07-21T13:43:56+5:30
मनीष मल्होत्राच्या शोमधून रणवीर सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

किस बाई किस! रणवीर-दीपिकाचं Kiss करु नका Miss, व्हिडीओ व्हायरल
Ranveer Singh : प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी काल रात्री एक शो आयोजित केला होता. यामध्ये अनेक मोठे स्टार्स सहभागी आहेत. या शोमध्ये रणवीर सिंगनेही जोरदार धम्माल केली आहे. तो आलिया भटसोबत रॅम्प वॉक करताना दिसला. दरम्यान, मनीष मल्होत्राच्या शोमधून रणवीर सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने असे काही केले आहे की सोशल मीडियावर लोक त्याचे कौतुक करत आहेत.
व्हायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चर्चेचा विषय ठरल आहे. या क्लिपमध्ये रणवीर सिंग रॅम्पवर चालताना दिसत आहे. मध्येच थांबून त्याने दीपिका पादुकोणाला एक किस्स घेतले. अभिनेत्याने दीपिकाजवळ बसलेल्या आईच्या पाया पडून आशीर्वादही घेतला. रणवीर सिंगची ही स्टाईल सगळ्यांनाच आवडली आहे. ट्विटरवर लोक रणवीर सिंगचे कौतुक करत आहेत.
रणवीर सिंग आणि आलिया भट लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट 28 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. नुकताच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातील गाणं मका प्रदर्शित झाला, जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या गाण्यावर लोक सतत रील व्हिडिओ बनवत आहेत. याशिवाय 'तुम क्या मिले' या चित्रपटातील इतर गाण्यांनाही लोकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आता 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.