OMG...! दीपिकाने सांगितलेल्या ह्या गोष्टी कटाक्षाने पाळतो रणवीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 19:44 IST2019-01-17T19:42:20+5:302019-01-17T19:44:01+5:30

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले आहेत.

Ranveer Singh Follows Wife Deepika Padukone's This Instruction | OMG...! दीपिकाने सांगितलेल्या ह्या गोष्टी कटाक्षाने पाळतो रणवीर

OMG...! दीपिकाने सांगितलेल्या ह्या गोष्टी कटाक्षाने पाळतो रणवीर

ठळक मुद्देरणवीरला रात्री उशीरा घराबाहेर थांबण्यास दीपिकाची सक्त मनाईदीपिकाने रणवीरला काही गोष्टींसाठी बजावले


बॉलिवूडमधील सर्वात लाडके व लोकप्रिय जोडपे म्हणजे दीपिका पादुकोणरणवीर सिंग. या दोघांच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले आहेत. या दोन महिन्यांत दीपिकाच्या येण्याने रणवीरच्या आयुष्यात काय बदल झाले हे जाणून घेण्यास त्यांचे चाहते खूप उत्सुक होते. त्या निमित्ताने एका मुलाखतीत रणवीरला लग्नानंतर दीपिकाने तुझ्या कोणत्या सवयींवर बंदी घातली आहे, असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना दीपिकाने लग्नानंतर मला तीन गोष्टी करण्यास कायमची बंदी घातली असल्याचे सांगितले.


दीपिकाने रणवीरच्या कोणत्या सवयींवर बंदी घातली आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना. याबाबत रणवीर म्हणाला की, रात्री उशीरापर्यंत घराबाहेर थांबण्यास दीपिकाने मला सक्त मनाई केली आहे. इतकेच नाही तर उपाशीपोटी घरातून बाहेर पडायचे नाही. त्यामुळे कितीही महत्त्वाचे काम असले तरी उपाशीपोटी घर सोडण्यास तिने बंदी घातली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत फोन कॉल चुकवायचा नाही. कामामुळे तिचा फोन उचलला नाही तर वेळ मिळताच लगेच फोन करायचा असे दीपिकाने मला बजावून ठेवले आहे त्यामुळे तिने सांगितलेल्या गोष्टी मी कटाक्षाने पाळतो.


दीपिका पादुकोणच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर दीपिकाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले असून लक्ष्मी अग्रवालवरील बायोपिक 'छपाक' सिनेमा तयार करणार आहे. दीपिकाने सिनेमातील निगडीत व्यक्तींसोबत बैठक केली व या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रोस्थेटिक मेकअपची करण्याची गरज आहे की नाही, यावर सल्ले घेतले.  'छपाक' चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Ranveer Singh Follows Wife Deepika Padukone's This Instruction