रणवीर सिंहच्या 'डॉन 3' साठी आणखी वाट बघावी लागणार, पुढे ढकललं शूटिंग; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 16:28 IST2024-09-06T16:27:34+5:302024-09-06T16:28:11+5:30
या महिन्यात डॉन ३ च्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याची चर्चा होती. मात्र आता सिनेमाचं शूट बरंच पुढे ढकलण्यात आलं आहे.

रणवीर सिंहच्या 'डॉन 3' साठी आणखी वाट बघावी लागणार, पुढे ढकललं शूटिंग; कारण...
फरहान अख्तर (Farhan Akhtar) दिग्दर्शित 'डॉन 3' (Don 3) मध्ये शाहरुखच्या जागी रणवीर सिंह दिसणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली. डॉन 3 मध्ये रणवीर सिंह आणि कियारा अडवाणीची जोडी झळकणार आहे. या महिन्यात डॉन ३ च्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याची चर्चा होती. मात्र आता सिनेमाचं शूट बरंच पुढे ढकलण्यात आलं आहे. याचं कारणही समोर आलं आहे.
'डॉन 3' हा बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित सिनेमा असणार आहे. सिनेमाचं शूट आता थेट पुढील वर्षीच सुरु होणार असल्याचं समजत आहे. त्यामुळे चाहत्यांना सिनेमाच्या रिलीजसाठी काही वर्ष वाट बघावी लागणार आहे. याला कारणही स्वत: फरहान अख्तर आहे. फरहान अख्तर आगामी '१२० बहादुर' सिनेमात दिसणार आहे. याची घोषणा त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत केली होती. यात त्याने स्वत: काम केलं आहे. हा सिनेमा 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित आहे. सध्या फरहान सिनेमाचं शूट करत आहे. यामुळेच त्याला त्याच्या इतर दिग्दर्शनाच्या प्रोजेक्टपासून काही काळ लांब राहायचं आहे. म्हणूनच डॉन 3 च्या पहिल्या शेड्युलला काही काळ पुढे ढकलण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे रणवीर सिंह आदित्य धरचा सिनेमात काम करणार आहे. म्हणूनच तो यावर्षी इतर कोणत्याही प्रोजेक्टला वेळ देऊ शकणार नाही. अद्याप फरहान आणि रणवीर सिंहने यावर कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र मनोरंजनसृष्टीत सध्या ही चर्चा जोर धरुन आहे.