Ranveer Singh Deepika Padukone : शाहरूखचे शेजारी होणार रणवीर-दीपिका, ‘मन्नत’ जवळ खरेदी केलं इतक्या कोटींचं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 11:09 AM2022-07-11T11:09:57+5:302022-07-11T11:14:08+5:30

Ranveer Singh Deepika Padukone buy New Apartment: होय, रणवीर व दीपिका यांनी शाहरूखच्या ‘मन्नत’ शेजारच्या एका टॉवरमध्ये एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या अपार्टमेंटमधून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो.

Ranveer Singh Deepika Padukone buys quadruplex near Shah Rukh khan Mannat worth Rs 119 crore | Ranveer Singh Deepika Padukone : शाहरूखचे शेजारी होणार रणवीर-दीपिका, ‘मन्नत’ जवळ खरेदी केलं इतक्या कोटींचं घर

Ranveer Singh Deepika Padukone : शाहरूखचे शेजारी होणार रणवीर-दीपिका, ‘मन्नत’ जवळ खरेदी केलं इतक्या कोटींचं घर

googlenewsNext

Ranveer Singh Deepika Padukone buy New Apartment:  बॉलिवूडचं पॉवर कपल रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone : ) लवकरच ‘किंगखान’ शाहरूख खान ( Shah Rukh khan) याचे शेजारी बनणार आहेत. होय, रणवीर व दीपिका यांनी शाहरूखच्या ‘मन्नत’ शेजारच्या एका टॉवरमध्ये एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. सागर रेशम रेसिडेंशिअलमध्ये हे अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमधून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. दीपवीरचं हे नवं घर कसं आहे, याची किंमत किती आहे, हे वाचून तुम्हीही थक्क व्हल.

रिपोर्टनुसार, दीपवीर तूर्तास या नव्या घरात शिफ्ट होऊ शकत नाहीत. कारण सध्या ते अंडर कंस्ट्रक्शन आहे. या सी फेसिंग अपार्टमेंटची किंमत किती आहे? तर दीपवीरने या अलिशान अपार्टमेंटसाठी सुमारे 119 कोटी रुपये मोजल्याचे म्हटले जात आहे. रणवीरचे हे घर देशातील महागड्या घरांपैकी एक आहे.

रणवीरचे हे घर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट आणि शाहरुखच्या मन्नत बंगल्या जवळ आहे. 11 हजार 266 चौरस फूटात असलेलं हे अपार्टमेंट चार मजल्यांचं आहे. 16 व्या, 17 व्या, 18 व्या आणि 19 व्या माळ्यावरच्या या घरासाठी रणवीरला 18 पार्किंग स्लॉट मिळाले आहेत. या घरासाठी रणवीरने महसूल विभागाला 7 कोटी 13 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरलं आहे.

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, तर काही दिवसांपूर्वी रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याचे अनेक प्रोजेक्ट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.  रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटात तो दिसणार आहे. त्यासोबतच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या चित्रपटात तो दिसणार आहे. यात तो आलिया भटसोबत स्क्रिन शेअर करतोय.

Web Title: Ranveer Singh Deepika Padukone buys quadruplex near Shah Rukh khan Mannat worth Rs 119 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.