'धुरंधर २'चं यश साजरं करण्यासाठी मुंबईतील वरळीत आले दीपिका-रणवीर; लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 10:30 IST2026-03-23T10:28:59+5:302026-03-23T10:30:03+5:30

रणवीर-दीपिका हे स्टार कपल रविवारी दुपारी मुंबईच्या वरळी भागातील एका मराठमोळ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. या दोघांना अचानक वरळीत पाहून चाहत्यांची एकच गर्दी झाली

Ranveer singh and deepika padukone arrive in Worli masali restaurant amid dhurandhar 2 success | 'धुरंधर २'चं यश साजरं करण्यासाठी मुंबईतील वरळीत आले दीपिका-रणवीर; लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड

'धुरंधर २'चं यश साजरं करण्यासाठी मुंबईतील वरळीत आले दीपिका-रणवीर; लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार केला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, या यशानंतरही दीपिका पादुकोणने सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट न केल्यामुळे आणि चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला गैरहजेर राहिल्याने गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर, रविवारी दुपारी दीपिका आणि रणवीर मुंबईत पहिल्यांदाच एकत्र दिसले, ज्यामुळे त्यांच्यात काही बिनसलं असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हे स्टार कपल रविवारी दुपारी मुंबईच्या वरळी भागातील एका मराठमोळ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताच चाहत्यांनी रणवीर-दीपिकाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. यावेळी रणवीरला पाहून चाहत्यांनी 'बब्बर शेर' अशी जोरात घोषणाबाजी केली. आपल्या पतीचे हे यश पाहून दीपिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. पांढरा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम अशा साध्या लूक मध्ये असलेली दीपिका हसतमुखाने चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत होती.


गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दीपिकाची तुलना 'धुरंधर २' चे दिग्दर्शक आदित्य धर यांची पत्नी यामी गौतमशी केली जात होती. यामी सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. मात्र, दीपिकाने 'धुरंधर २' रिलीज होऊनही काहीच पोस्ट किंवा व्हिडीओ शेअर केला नाही. त्यामुळे दीपिकावर लोक चांगलेच नाराज झाले होते. इतकंच नव्हे तर दीपिका-रणवीरमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते.

 रविवारी रणवीरसोबत वरळीतील हॉटेलमध्ये जाऊन दीपिकाने वेळ घालवला. त्याआधी शनिवारी ती आपल्या सासू आणि नणंद यांच्यासोबत एका म्युझिक कॉन्सर्टमध्येही दिसली होती. त्यामुळे एकूणच दीपिका आणि रणवीर यांना अनेक दिवसांनी एकत्र पाहून चाहते सुखावले. 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई करत असून ४ दिवसांत 'धुरंधर २'ने अनेक सिनेमांचे विक्रम मोडीत काढले आहेत.

Web Title : मुंबई के वर्ली में दीपिका और रणवीर ने 'धुरंधर 2' की सफलता का जश्न मनाया।

Web Summary : दीपिका पादुकोण और रणवीर सिंह ने मुंबई में 'धुरंधर 2' की सफलता का जश्न मनाया, अलगाव की अफवाहों के बीच। वे वर्ली के एक रेस्तरां में गए, प्रशंसकों का अभिवादन किया और दीपिका के एक संगीत कार्यक्रम में रणवीर के परिवार के साथ दिखने के बाद अलगाव की अटकलों को दूर किया।

Web Title : Deepika and Ranveer celebrate 'Dhurandhar 2' success in Worli, Mumbai.

Web Summary : Deepika Padukone and Ranveer Singh celebrated the success of 'Dhurandhar 2' in Mumbai, amidst rumors of a rift. They visited a restaurant in Worli, greeted fans, and dispelled separation speculations after Deepika was seen with Ranveer's family at a concert.