रणवीर की अनीशा...? दोघांमध्ये फसली दीपिका पादुकोण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 10:40 IST2019-04-25T10:40:17+5:302019-04-25T10:40:59+5:30

एकीकडे रणवीरला दीपिकाचा वेळ हवा होता आणि दुसरीकडे दीपिकाची बहीण अनीशा हिलाही आपल्या दीदीसोबत वेळ घालवायचा होता. मग काय, दीपिका रणवीर आणि अनीशा या दोघांमध्ये फसली.

ranveer singh and anisha padukone smashed deepika padukone | रणवीर की अनीशा...? दोघांमध्ये फसली दीपिका पादुकोण!

रणवीर की अनीशा...? दोघांमध्ये फसली दीपिका पादुकोण!

ठळक मुद्देदीपिकाने अलीकडे ‘छपाक’चे पहिले शेड्यूल पूर्ण केले आणि ती दिल्लीवरून मुंबईला परतली.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दीपिका पादुकोण हे दोघेही आपआपल्या कामात बिझी आहेत. यादरम्यान थोडा निवांत वेळ मिळाला आणि दोघांनीही एकमेकांना क्वालिटी टाईम देण्याचा निर्णय घेतला. एकीकडे रणवीरला दीपिकाचा वेळ हवा होता आणि दुसरीकडे दीपिकाची बहीण अनीशा हिलाही आपल्या दीदीसोबत वेळ घालवायचा होता. मग काय, दीपिका रणवीर आणि अनीशा या दोघांमध्ये फसली.
दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यात रणवीर, दीपिकाची बहीण अनीशा पादुकोण हे दोघे आहेत. हा फोटो जरा लक्षपूर्वक पाहिल्यानंतर दीपिका या दोघांमध्ये फसलेली दिसतेय. तिघांच्याही चेहºयार हसू आहे. ‘मी तर या दोघांमध्ये चांगलीच फसली...’, असे दीपिकाने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.

दीपिकाने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. आत्तापर्यंत या फोटोला २ लाखांवर लोकांनी लाईक केले आहे.
दीपिकाने अलीकडे ‘छपाक’चे पहिले शेड्यूल पूर्ण केले आणि ती दिल्लीवरून मुंबईला परतली. या चित्रपटात दीपिकाच्या अपोझिट विक्रांत मेस्सी दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांचे चित्रपटातील किसींग सीन लिक झाले होते. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे.


रणवीरही ‘८३’ या चित्रपटात बिझी आहे. यात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची कथा १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाले जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड क्रिकेट कपवर आधारित आहेत.

Web Title: ranveer singh and anisha padukone smashed deepika padukone