Shocking : का आली रणवीर सिंगवर अक्षय आणि अजय देवगणचे पाया धरण्याची वेळ?, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 12:58 PM2020-03-03T12:58:14+5:302020-03-03T12:59:55+5:30

सध्या हा व्हिडीओला सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

Ranveer singh akshay kumar ajay devgn rohit shetty katrina kaif viral video at sooryavanshi trailer launch gda | Shocking : का आली रणवीर सिंगवर अक्षय आणि अजय देवगणचे पाया धरण्याची वेळ?, व्हिडीओ व्हायरल

Shocking : का आली रणवीर सिंगवर अक्षय आणि अजय देवगणचे पाया धरण्याची वेळ?, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग अभिनयासोबतच आपल्या मस्तीखोर स्वभावामुळेसुद्धा प्रसिद्ध आहे. रणवीर सिंग ज्याठिकाणी जातो तिथल्या व्यक्तिंची मनं जिंकून घेतो. नुकताच रणवीर सिंगचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


सूर्यवंशीच्या ट्रेलर लाँचच्यावेळी असाच एक प्रकार घडला. ट्रेलर लाँच इव्हेंटच्या ठिकाणी अक्षय कुमार, अजय देवगण, रोहित शेट्टी, कतरिना कैफ आणि करण जोहर हजर होते. पण रणवीर सिंग उशीराने याठिकाणी पोहोचला. मात्र शांतपणे येईल तो रणवीर सिंग कुठेला? या इव्हेंटच्या ठिकाणी रणवीर 40 मिनिटं उशीराने आला. येताच त्याने रोहित शेट्टीला मिठ्ठी मारली तर अक्षय, अजय, करण आणि कतरिनाला बघून लगेच उठाबशा काढायला सुरुवात केली. बंर आता तो इथेच थांबला नाही तर अक्षय आणि अजय आणि करण जोहराच्या जाऊन पायादेखील पडला.   

या व्हिडीओत अक्षय कुमार रणवीरला म्हणतोय की, हा पहिला ज्युनिअर अभिनेता आहे जाने चार-चार सिनिअर अभिनेत्यांना चक्क 40 मिनिटं वाट पाहायला लावली आहे. यावर रणवीर सिंगपण मेट्रोचं काम सुरुय म्हणून मला यायला उशीर झाला असं मजेदार उत्तर देताना दिसतोय. सध्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळतेय.      

रोहित शेट्टी सूर्यवंशी सिनेमाचे दिग्दर्शन केलंय.येत्या 24 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षय कुमारची धमाकेदार अ‍ॅक्शन, कतरीनासोबतची त्याची रोमॅन्टिक केमिस्ट्री आणि रणवीर सिंग आणि अजय देवगणची सरप्राईज एन्ट्री असा सूर्यवंशीचा अ‍ॅक्शनपॅक्ड ट्रेलर आहे. ट्रेलरमध्ये ‘सूर्यवंशी’च्या कथेची झलक पाहायला मिळते. एटीएस अधिकारी असलेला अक्षय देशासाठी काहीही करू शकतो याचदरम्यान अक्षयला एका अज्ञात हल्ल्याबद्दल कळते. ट्रेलरच्या शेवटी रणवीर सिंगची एन्ट्री होते आणि यानंतर सिंघम अर्थात अजय देवगणही धमाकेदार एन्ट्री घेतो. ट्रेलरमधील अक्षयची अ‍ॅक्शन दमदार आहे. अक्षयला पुन्हा या रूपात पाहणे इंटरेस्टिंग आहे.

 

Web Title: Ranveer singh akshay kumar ajay devgn rohit shetty katrina kaif viral video at sooryavanshi trailer launch gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.