रणवीर-दीपिका एका वेळच्या जेवणासाठी खर्च करतात लाखों रूपये, याच ठिकाणाहून जेवण करतात ऑर्डर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:51 IST2019-11-04T12:51:07+5:302019-11-04T12:51:35+5:30
या जेवणामध्ये कायम पौष्टीक पदार्थाचा समावेश असतो. ती सकाळी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिक्स करून पाणी पिते. त्यानंतर नाश्त्यामध्ये दोन उकडलेली अंडी, बदाम, एक ग्लास लो फॅट मिल्क, 2 इडली किंवा 2 प्लेन डोसा,उपमा हे पादर्थ ती खाते.

रणवीर-दीपिका एका वेळच्या जेवणासाठी खर्च करतात लाखों रूपये, याच ठिकाणाहून जेवण करतात ऑर्डर
स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी कलाकार मंडळी वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. नियमित न चुकता व्यायाम, योगा करणे, तसेच योग्य आहार घेणे या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहेत. मात्र त्या पलिकडेही जाऊन दीपवीर जेव्हा शूटिंगमध्ये बिझी असतात. तेव्हा तेही सर्वसामान्याप्रमाणे ऑनलाईन फुड ऑर्डर करतात. मात्र फुड ऑर्डर करताना हे फक्त एकाच ठिकणाहून ऑर्डर करतात. त्याचे नाव आहे पॉड सप्लाय. ही कंपनी सेलिब्रेटी मंडळींना हेल्दी डाएट फुड पुरवते. त्यामुळे अक्षय कुमार, अनिल कपूर तसेच दीपवीर देखील याच कंपनीकडून टीफिन सर्व्हिस घेतात.यासाठी लाखो रूपये ही कंपनी चार्ज करते.
दीपिका रोज दिवसातून सहा वेळा थोड्या थोड्या प्रमाणात जेवण करते.या जेवणामध्ये कायम पौष्टीक पदार्थाचा समावेश असतो. ती सकाळी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिक्स करून पाणी पिते. त्यानंतर नाश्त्यामध्ये दोन उकडलेली अंडी, बदाम, एक ग्लास लो फॅट मिल्क, 2 इडली किंवा 2 प्लेन डोसा,उपमा हे पादर्थ ती खाते.
तसेच दीपिका लवकरच आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याला कारणीभूत ठरला तो म्हणजे तिच्याच बालपणीचा फोटो. तिने स्वतःच्या बालपणाचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत. यावर असे मध्येच आपले फोटो शेअर करत असल्यामुळे नेटीझन्स संभ्रमात आहे. तर दुसरीकडे अनेक नेटीझन्सना ती गुड न्युज देणार असल्याचे वाटत आहे.