पडद्यावर पुन्हा दिसणार वर्दीचा रुबाब! तीन भागांच्या यशानंतर 'मर्दानी ४' येणार? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 14:09 IST2026-02-18T14:07:37+5:302026-02-18T14:09:38+5:30

तीन भागांच्या यशानंतर  'मर्दानी ४' सुद्धा येणार? दिग्दर्शकाने दिले संकेत, म्हणाले... 

rani mukerji mardaani 4 happen in future director abhiraj minawala share update  | पडद्यावर पुन्हा दिसणार वर्दीचा रुबाब! तीन भागांच्या यशानंतर 'मर्दानी ४' येणार? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं 

पडद्यावर पुन्हा दिसणार वर्दीचा रुबाब! तीन भागांच्या यशानंतर 'मर्दानी ४' येणार? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं 

Mardaani 4 Update: हिंदी सिनेरसिकांच्या ऑल टाईम फेवरेट सिनेमांपैकी एक नाव राणी मुखर्जीचा मर्दानी सिनेमा. या सिनेमात शिवानी शिवाजी रॉय  नावाच्या महिला पोलीसाची भूमिका साकारून राणी मुखर्जी चांगलाच भाव खाऊन गेली. यशराज फिल्म्सचा यशस्वी फ्रँचायझी तिसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. व्यवसायिक दृष्ट्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. मर्दानी ३ ला प्रेक्षकांसह समीक्षकांची सुद्धा तितकीच दाद मिळाली. त्यात आता तिसऱ्या भागाच्या यशानंतर मर्दानीचा चौथा भाग येणार असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नुकताच 'मर्दानी ३' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे प्रेक्षक आता चौथ्या भागाबद्दल विचारणा करु लागले आहेत. याबद्दल दिग्दर्शक अभिराज मिनावाला यांनी मोठी अपडेट दिली आहे. 'मर्दानी 3' च्या यशानंतर दिग्दर्शक अभिराज मिनावाला यांनी अलीकडेच एएनआय या वृत्तसंस्थेशी खास संवाद साधला आणि त्यादरम्यान त्यांना मर्दानी 4 बद्दल महत्त्वाचे प्रश्नही विचारण्यात आले. त्यावर उत्तर देत ते म्हणाले, माझ्या मते, मर्दानी ४ नक्कीच बनवायला हवा. शिवाय, असे अनेक चित्रपट आहेत ज्यांच्याबद्दल नक्कीच विचार झाला पाहिजे.

त्यानंतर ते म्हणाले, मर्दानी आणि मर्दानी २ ने आम्हाला तिसरा भाग बनवण्याची प्रेरणा मिळाली. पण हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे की मर्दानी २ २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता, सात वर्षांनंतर, तिसरा भाग आला आहे.मर्दानी ४ बद्दल बोलायचं झालं तर त्यासाठी एक उत्तम पटकथा आणि उत्तम आशय असलेली कथा असणं आवश्यक आहे. अशाप्रकारे अभिराज मीनावाला यांनी मर्दानी 4 च्या बाबत उत्तर दिलं आहे.

राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या मर्दानी सिनेमाचे तिन्ही भाग गाजले. २०१४ मध्ये आलेल्या 'मर्दानी' चित्रपटाचा पहिला भाग आला. यात राणी णी मुखर्जीने पोलीस अधिकारी शिवानी रॉयची भूमिका साकारली होती आणि तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. मर्दानीचा दुसरा भाग २०१९ मध्ये आला होता. आता या  फ्रँचायझीचा तिसरा भागही तितकाच गाजतोय. यावेळी, ती हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी आणि त्यांच्यामागील टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी एका मोहिमेवर निघते. 

Web Title : क्या 'मर्दानी 4' आएगी? तीसरे भाग की सफलता के बाद निर्देशक ने बताया

Web Summary : 'मर्दानी 3' की सफलता के बाद, निर्देशक ने 'मर्दानी 4' की संभावनाओं पर बात की। एक बेहतरीन स्क्रिप्ट जरूरी है। रानी मुखर्जी का शिवानी शिवाजी रॉय का किरदार दर्शकों को पसंद आया, जिससे फ्रैंचाइज़ी हिट हो गई।

Web Title : 'Mardaani 4' Coming? Director Clarifies After Success of Third Installment

Web Summary : Following 'Mardaani 3' success, director addresses 'Mardaani 4' possibilities. A compelling script is essential. Rani Mukerji's portrayal of Shivani Shivaji Roy has captivated audiences, making the franchise a hit.