राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीनं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 13:00 IST2025-08-03T12:45:51+5:302025-08-03T13:00:55+5:30
मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिरात जाऊन राणी मुखर्जीने बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीनं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, फोटो व्हायरल
Rani Mukerji Visits Siddhivinayak Temple: मनोरंजन क्षेत्रात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (71st National Film Awards) शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. बॉलिवूड अभिनेत्री रानी मुखर्जीला आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. राणी मुखर्जीला 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीनं सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले.
सिद्धिविनायक मंदिराच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर राणी मुखर्जीच्या मंदिरातील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये राणी ही पारंपरिक निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिचा हा साधा आणि पारंपरिक लूक चाहत्यांना प्रचंड भावला असून, तिच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ या चित्रपटात राणी मुखर्जीने देबिका चॅटर्जी ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. ज्यात आपल्या मुलांसाठी आईच्या संघर्षाची कथा मांडली होती. प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं होतं. हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.
राणी मुखर्जीच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर 'मर्दानी ३' मध्ये झळकणार आहे. यश राज फिल्म्सकडून 'मर्दानी ३'ची रिलीज डेटची जाहिर करण्यात आली आहे. पुढील वर्षी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी 'मर्दानी ३' प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, राणी मुखर्जीने 'राजा की आएगी बारात" सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर तिने 'कुछ कुछ होता है', 'गुलाम', 'कभी अलविदा ना कहना' असे एकापेक्षा एक सिनेमे दिलेत.