Randeep Hooda Birthday : सुष्मिता सेनसोबत ब्रेकअप करून रणदीप हुड्डा होता खूश, मुलाखतीत म्हणाला होता - वाचलो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 16:00 IST2020-08-20T15:56:12+5:302020-08-20T16:00:54+5:30
रणदीप हुड्डा हा सर्वात जास्त चर्चेत तेव्हा होता जेव्हा त्याचं नान मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनसोबत जुळलं होतं. दोघांनीही एकमेकांना साधरण ३ वर्षे डेट केलं आणि नंतर एक दिवस अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली.

Randeep Hooda Birthday : सुष्मिता सेनसोबत ब्रेकअप करून रणदीप हुड्डा होता खूश, मुलाखतीत म्हणाला होता - वाचलो!
मेहनत आणि इच्छाशक्तीसोबत बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा रणदीप हुड्डा आज ४४ वर्षांचा झाला. 'लाल रंग', 'सरबजीत', 'हाइवे' सारख्या सिनेमात अफलातून अभिनय केल्याने फॅन्स त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट नावानेही बोलवतात. रणदीप हुड्डाबाबत सांगितलं जातं की, तो जी भूमिका साकारतो त्यात रमून जातो. रणदीप हा त्याच्या लव्ह लाइफमुळेही अनेकदा चर्चे होता.
रणदीप हुड्डा हा सर्वात जास्त चर्चेत तेव्हा होता जेव्हा त्याचं नान मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनसोबत जुळलं होतं. दोघांनीही एकमेकांना साधरण ३ वर्षे डेट केलं आणि नंतर एक दिवस अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. तर सुष्मिता सेनसोबत ब्रेकअप केल्यावर रणदीप हा फार खूश होता. हे आम्ही नाही तर रणदीपने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
एका मुलाखतीत रणदीपने सुष्मितासोबतच्या नात्याबाबत अनेक खुलासे केले होते. हे खुलासे ऐकून सगळेच हैराण झाले होते. त्याने सांगितले होते की, सुष्मितासोबत ब्रेकअप करून तो फार आनंदी होता. तो म्हणाला होता की, 'मी कधीच सुष्मितासोबत रिलेशनमध्ये नव्हतो आणि तसं मला कधी जाणवलं देखील नाही. माझं नातं केवळ तिची मुलगी रिनीसोबत होतं. सुष्मितासोबत ब्रेकअपनंतर माझं लाइफ पूर्णपणे बदललं आहे. ब्रेकअपनंतर मला जाणवलं की, मी माझ्या आयुष्यातील फार जास्त वेळ या गोष्टीला दिला. जो मी द्यायला नको होता'.
दरम्यान रणदीप हुड्डाचं शालेय शिक्षण हरयाणाच्या राय शहरातील मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्टिंसमधून झालं. याच शाळेत त्याने स्वीमिंग आणि घोडस्वारीत राष्ट्रीय मेडल जिंकले होते. नंतर तो दिल्लीला शिकण्यासाठी गेला. तो १२वीत एकदा फेलही झाला होता. नंतर तो एमबीए करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता.
हे पण वाचा :
राजस्थानला जाण्यासाठी एकाने मागितली कार, सोनू सूदचं उत्तर वाचून हसून लोटपोट झाले लोक!
बाबो! सोनू सूदकडे एका दिवशी किती लोक मागतात मदत? पहिल्यांदाच शेअर केली आकडेवारी!