Animal नंतर रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची चर्चा, समोर आली नवी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 11:42 IST2023-12-13T11:41:11+5:302023-12-13T11:42:03+5:30

'आदिपुरुष' नंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये रामायणावर सिनेमा येणार आहे.

Ranbir Kapoor will be seen next in ramayan movie in shri ram role shoot may starts next year in summer | Animal नंतर रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची चर्चा, समोर आली नवी अपडेट

Animal नंतर रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची चर्चा, समोर आली नवी अपडेट

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या Animal चं यश एन्जॉय करत आहे. Animal मध्ये रणविजय सिंह ही सायको भूमिका साकारल्यानंतर आता त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची चर्चा आहे. रणबीर नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात श्रीरामाची भूमिका साकारणार हे निश्चित झाले आहे. आता रामायण विषयी नवी अपडेट समोर आली आहे. फिल्मच्या शूटसंदर्भात नवी माहिती मिळाली आहे. 

'आदिपुरुष' नंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये रामायणावर सिनेमा येणार आहे. नितेश तिवारी आणि मधु मंटेना यांनी 'रामायण' सिनेमाची जबाबदारी घेतली आहे. माध्यम रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर श्रीराम, साई पल्लवी सीता आणि केजीएफ स्टार यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर नवीन मिळालेल्या माहितीनुसार, फिल्मचं शूट पुढील वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात सुरु होईल.  मात्र अद्याप नितेश तिवारींकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र एका चाहत्याच्या ट्वीटने लक्ष वेधलं आहे. इमिग्रेशनच्या रांगेत रणबीर कपूरला हा चाहता भेटला. तेव्हा त्याने रामायणविषयी विचारलं असता सिनेमाचं शूट पुढील वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात सुरु होईल असं सांगितलं आहे. तसंच सिनेमाची स्टारकास्टही कडक आहे असंही त्याने लिहिलं. 

'रामायण' शिवाय रणबीर कपूरकडे इतरही काही चित्रपट आहेत. यामध्ये 'ब्रह्मास्त्र 2','Animal पार्क' यांचा समावेश आहे. यामध्ये  'रामायण' च्या शूटिंगला सर्वात आधी सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Web Title: Ranbir Kapoor will be seen next in ramayan movie in shri ram role shoot may starts next year in summer