हॉस्पिटल बाहेर दिसला रणबीर कपूर, चाहते पडले चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 17:40 IST2021-01-07T17:40:01+5:302021-01-07T17:40:58+5:30
रणबीर कपूरचा हॉस्पिटल बाहेरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

हॉस्पिटल बाहेर दिसला रणबीर कपूर, चाहते पडले चिंतेत
अभिनेता रणबीर कपूर वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतो. बऱ्याचदा तो भूमिकेमुळे किंवा आलिया भटसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असतो. तसेच त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते खूपच उत्सुक असतात. बुधवारी रणबीर कपूर हॉस्पिटल बाहेर दिसला. त्याचा हॉस्पिटल बाहेरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.
झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूर या फोटोत निळ्या रंगाच्या शर्ट आणि डेनिममध्ये दिसत आहे. रणबीर मास्कसोबतच कॅपमध्ये दिसत आहे. या फोटोत रणबीर पुढे जाताना दिसतो आहे. रणबीर कपूर पोहोचण्याअगोदरच मीडिया तेथे उपस्थित आहे.
एक दिवस अगोदर रणबीर कपूर मैत्रीण आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या बर्थडे पार्टीला पोहोचला होता. त्यावेळी त्याच्यासोबत आलिया भट देखील होती. या पार्टीत दोघेही काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत होते. त्यापूर्वी रणबीर कपूर आलिया भट आणि कुटुंबासोबत सुट्ट्यांवर राजस्थानला गेला होता. नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी हे फिरायला गेले होते. रणथंभौरच्या एका रिसॉर्टमध्ये हे सगळेजण थांबले होते.
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो अयान मुखर्जीचा चित्रपट ब्रह्मास्त्रमुळे चर्चेत आले. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मौनी रॉय व्हिलनच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. रणबीर कपूर शेवटचा राजकुमार हिराणीचा चित्रपट संजूमध्ये झळकला होता. हा चित्रपट संजय दत्तच्या जीवनावर आधारीत होता. या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.