रणबीर कपूरला या कारणामुळे अभिनयाला करायचाय रामराम?, 'अॅनिमल'च्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्याचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 16:00 IST2023-11-28T15:59:35+5:302023-11-28T16:00:21+5:30
Ranbir Kapoor : सध्या रणबीर कपूर त्याचा आगामी चित्रपट 'अॅनिमल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रणबीर कपूरला या कारणामुळे अभिनयाला करायचाय रामराम?, 'अॅनिमल'च्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्याचा खुलासा
सध्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या आगामी 'अॅनिमल' (Animal Movie) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेता त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दररोज वेगवेगळ्या शहरांना भेट देत आहे. यावेळी रणबीर त्याच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्याबद्दल खुलासा करत आहे. यादरम्यान, अभिनेत्याने खुलासा केला आहे की त्याला राहासोबत अधिकाधिक वेळ घालवायचा आहे आणि अभिनय करण्याची इच्छा नाही.
नुकताच रणबीर कपूर 'अॅनिमल'च्या प्रमोशनसाठी चेन्नईला पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत बॉबी देओल आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाही दिसले. आता हैदराबादमध्ये एका पत्रकार परिषदेत रणबीरने मुलगी राहाविषयी सांगितले. तो म्हणाला की, मला फक्त तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे. मला अभिनय थांबवायचा आहे, काम बंद करायचं आहे. मला एवढेच करायचे आहे, पण मी हे करू शकत नाही. मलाही माझी आवड जोपासायची आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे. देव जेव्हा काही हिरावून घेतो तेव्हा तो तुम्हाला काहीतरी देतो आणि राहा आमच्या आयुष्यात आली. याबद्दल मी खूप आभारी आहे.
राहा कपूर झाली १ वर्षाची
रणबीर कपूर आणि आलिया भट गेल्या वर्षी ६ नोव्हेंबर, २०२२ रोजी राहाचे पालक झाले. नुकतेच या जोडप्याने त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला. मात्र, या जोडप्याने अद्याप आपल्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही. राहाचा जन्म झाला तेव्हा रणबीर 'अॅनिमल'चे शूटिंग करत होता.
'अॅनिमल' १ डिसेंबरला होणार रिलीज
'अॅनिमल' तीन दिवसांनी म्हणजेच १ डिसेंबरला पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉबी आणि रणबीरशिवाय रश्मिका मंदाना आणि अनिल कपूर दिसणार आहेत. संदीप रेड्डी वंगा यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनला आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. २ लाखांहून अधिक अॅनिमलची तिकिटे विकली गेल्याची माहिती समोर येत आहे.