'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी जमिनीवर बसून जेवला होता रणबीर कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:35 IST2025-04-07T15:35:08+5:302025-04-07T15:35:54+5:30
रणबीर कपूर स्टार होण्याआधीचा मजेदार किस्सा

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी जमिनीवर बसून जेवला होता रणबीर कपूर
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा तो मुलगा. रणबीर कपूरने त्याच्या अभिनयाने इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं. रणबीर कपूरने २००७ मध्ये ‘सावरिया’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याला फारसं यश मिळालं नाही, पण त्यानंतर त्याने एकामागून एक अनेक कॉमेडी आणि रोमँटिक चित्रपट करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. अशातच प्रसिद्ध ज्येष्ठ मराठमोळी अभिनेत्री स्मिता जयकर यांनी रणबीरचा ( Smita Jaykar on Ranbir Kapoor ) एक किस्सा सांगितला. ही गोष्ट रणबीरच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीची आहे.
नुकतंच स्मिता जयकर यांनी 'लोकमत फिल्मी'ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा त्यांच्या घरातील एक किस्सा सांगितला आहे. त्या म्हणाल्या, " एकदा रणबीर कपूर, बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे तिघं माझ्या घरी आले होते. ते लोक जेवायच्या वेळेला आले होते. संजयला तेव्हा कोळंबीचं कालवण वगैरे खूप आवडायचं. मी या तिघांना कोळंबीचं कालवण वाढलं. रणबीर एवढा साधा आहे की, तो माझ्या घरी जेवायला खाली जमिनीवर बसला होता".
पुढे त्या म्हणाल्या, "बॉलिवूड सेलिब्रिटी ही अगदी साधी आहेत. आपण त्यांना समाजात वावरताना पाहतो, तेव्हा त्यांच्या बाजूला बॉडिगार्ड असतात. कारण, लोक त्यांना छळतात. जर त्यांनी बॉडिगार्ड ठेवले नाही तर लोक त्यांना फाडून खातील. त्यांना तसं वागावं लागतं, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही", असं त्या म्हणाल्या.
स्मिता जयकर यांनी रणबीर कपूरसोबत 'अजब प्रेम की गजब कहानी' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये रणबीर कपूर आणि कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटामध्ये रणबीरच्या आईची भूमिका स्मिता यांनी साकारली आहे. स्मिता जयकर बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. 'अजब प्रेम की गजब कहानी'चं नाही तर अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांत त्यांनी आईच्या भूमिका साकारलेल्या आहेत. 'परदेस', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'हम दिल दे चुके सनम', 'मुझसे दोस्ती करोगे', 'देवदास' अशा हीट चित्रपटा त्यांनी मुख्य भुमिका साकारलेल्या आहेत.