Animal च्या Advance बुकिंगला सुरुवात, पहिल्या दोनच दिवसात केली तगडी कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 15:21 IST2023-11-27T15:20:34+5:302023-11-27T15:21:21+5:30
रणबीरच्या करिअरमधील हे सर्वात जास्त ओपनिंग कलेक्शन असू शकतं.

Animal च्या Advance बुकिंगला सुरुवात, पहिल्या दोनच दिवसात केली तगडी कमाई
Animal Movie Advance Booking: मनोरंजनविश्वात सर्वात जास्त कोणत्या सिनेमाची चर्चा असेल तर तो म्हणजे रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' Animal. सिनेमाच्या ट्रेलरने तर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चाहत्यांमध्ये ट्रेलर, डायलॉग्स, अॅक्शन याचीच चर्चा आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर दोनच दिवसात सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली होती. या बुकिंग्समधून आतापर्यंत तो आकडा समोर आलाय तो धक्कादायक आहे.
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगवरुन याला तगडी ओपनिंग मिळणार हे निश्चित आहे. तसंच रणबीरच्या करिअरमधील हे सर्वात जास्त ओपनिंग कलेक्शन असू शकतं. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सोमवार सकाळपर्यंत अॅनिमलचे २ लाखांपेक्षा जास्त अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. तीन मोठ्या नॅशनल चेन्समध्येच १ लाखांपेक्षा जास्त बुकिंग झालं आहे. रिलीजच्या ४ दिवस आधीच 'अॅनिमल'चं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ७ कोटीपर्यंत ग्रॉस कलेक्शन झाल्याचा अंदाज आहे.
'अॅनिमल' हा पिता-पुत्राचा बंध दाखवणारा चित्रपट आहे. यात अनिल कपूर आणि रणबीर कपूर बाप लेकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित क्राईम ड्रामा आहे. १ डिसेंबर २०२३ रोजी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत.