"रणबीरला कंडोमची...", दीपिका-सोनमच्या कमेंटवर संतापले होते ऋषी कपूर, आजही हा किस्सा येतो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:57 IST2025-03-05T10:56:21+5:302025-03-05T10:57:06+5:30
Rishi Kapoor : एकदा सोनम कपूर आणि दीपिका पादुकोण रणबीर कपूरबद्दल असे काही बोलल्या होत्या की त्यांच्यावर ऋषी कपूर चांगलेच संतापले होते.

"रणबीरला कंडोमची...", दीपिका-सोनमच्या कमेंटवर संतापले होते ऋषी कपूर, आजही हा किस्सा येतो चर्चेत
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) फक्त अभिनयामुळे नाही तर बेधडक विधान आणि रागासाठीही ओळखले जात होते. एकदा सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) रणबीर कपूर(Ranbir Kapoor)बद्दल असे काही बोलल्या होत्या की त्यांच्यावर ऋषी कपूर चांगलेच संतापले होते. ते इतके चिडले होते की त्या दोघींच्या करिअरवर प्रश्न उपस्थित केला होता. इतकेच नाही तर त्यांच्या क्लासवर टीका केली होती. हे प्रकरण खरंतर १५ वर्षांपूर्वीचं आहे. मात्र हा किस्सा सतत चर्चेत येत असतो.
२०१० साली दीपिका पादुकोण आणि सोनम कपूर करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये एकत्र सहभागी झाल्या होत्या. दीपिका आणि रणबीरचे वर्षभरापूर्वी ब्रेकअप झाले होते. यापूर्वी रणबीरचे नाव सोनम कपूरसोबतही जोडले गेले होते. या दोन्ही अभिनेत्रींनी करणच्या शोमध्ये रणबीरला टोमणे मारत काही कमेंट्स केल्या होत्या.
दीपिका आणि सोनम रणबीरबद्दल बोलल्या असं काही...
जेव्हा करणने दीपिकाला विचारले की ती रणबीर कपूरला कोणती भेटवस्तू द्यावीशी वाटते, तेव्हा ती म्हणाली की, मला कंडोम भेट द्यायला आवडेल कारण तो खूप वापरतो. रणबीरने कुठल्यातरी कंडोम कंपनीची जाहिरात करावी. त्याचवेळी सोनम कपूर म्हणाली होती की, रणबीर कपूर तिचा चांगला मित्र आहे, पण अभिनेता चांगला बॉयफ्रेंड आहे की नाही हे तिला माहीत नाही.
चिडलेले ऋषी कपूर
यावर ऋषी कपूर संतापले. 'हिंदुस्तान टाईम्स'च्या रिपोर्टनुसार, ऋषी कपूर म्हणाले होते, 'दोन्ही मुलींना मी एवढेच सांगेन की द्राक्षे आंबट आहेत. सोनमचे वडील अनिल कपूर यांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. मी दोन्ही मुलींना सांगेन की हे सर्व करण्यापेक्षा त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. इतके गॉसिप असलेले शो तुम्ही का चालवता? अभिनेता पुढे म्हणाले की, 'मी यापूर्वी नीतू, माझे भाऊ आणि माझ्या बहिणीसोबत 'कॉफी विथ करण'मध्ये गेलो आहे. त्यावेळी शोमध्ये असे होत नव्हते. आम्ही कोणालाही कमी लेखले नव्हते.मला वाटत नाही की तुम्ही लोकांमध्ये दुसऱ्यांची उणीवा काढल्या पाहिजेत. तुम्ही रणबीरला कधीच कोणाला कमी लेखताना पाहणार नाहीत.
'दोघांनी त्यांचा क्लास दाखवला'
तेव्हा ऋषी कपूर म्हणाले होते, 'मी अनिलला काय सांगू? सर्व माझ्याच कुटुंबातील आहेत आणि या मुली माझ्या मुलींसारख्या आहेत. मला माझ्या मुलाच्या मित्रांच्या भांडणात पडायचे नाही. त्यांचा कोणता क्लास आहे हे दिसून येते. मी फक्त त्यांना सांगू इच्छितो की उगाच खी-खी करणे थांबवा. त्याऐवजी, मोठे व्हा आणि प्रौढपणे वागा. ते त्यांच्या स्वतःच्या कामामुळे नव्हे तर त्यांच्या वडिलांच्या कामामुळे शोमध्ये आले आहेत. मी त्यांना सल्ला देईन की त्यांच्या सहकाऱ्यांना अशा प्रकारे निराश करू नका.