काय सांगता! रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार'चा सीक्वल येणार? दिग्दर्शक इम्तियाज अली म्हणाले-

By देवेंद्र जाधव | Updated: March 19, 2025 12:02 IST2025-03-19T11:42:30+5:302025-03-19T12:02:14+5:30

रणबीर कपूरच्या गाजलेल्या 'रॉकस्टार' सिनेमाचा पुढचा भाग येणार अशी चर्चा असतानाच दिग्दर्शक इम्तियाज अलींनी याविषयी मोठी माहिती दिली आहे

ranbir kapoor movie rockstar sequel updates by director imtiaz ali | काय सांगता! रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार'चा सीक्वल येणार? दिग्दर्शक इम्तियाज अली म्हणाले-

काय सांगता! रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार'चा सीक्वल येणार? दिग्दर्शक इम्तियाज अली म्हणाले-

रणबीर कपूरच्या (ranbir kapoor) कारकीर्दीतला मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे 'रॉकस्टार'. रणबीरने 'रॉकस्टार' (rockstar) सिनेमात साकारलेली जॉर्डनची भूमिका अजरामर ठरली. 'रॉकस्टार' सिनेमाची गाणी आणि ए.आर. रहमान यांनी दिलेल्या संगीताची चांगलीच चर्चा झाली. 'कुन फाया कुन', 'नादान परिंदे' ही 'रॉकस्टार'मधील गाणी आज अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये असतील. अशातच 'रॉकस्टार'चा सीक्वल येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. याविषयी 'रॉकस्टार'चे दिग्दर्शक इम्तियाज अलींनी खुलासा केलाय. काय म्हणाले बघा?

'रॉकस्टार'चा सीक्वल येणार?

'रॉकस्टार'चे दिग्दर्शक इम्तियाज अलींनी कोमल नहाटा यांच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत 'रॉकस्टार'च्या सीक्वलविषयी मौन सोडलं. इम्तियाज म्हणाले की, "मी रॉकस्टारचा सीक्वल भविष्यात कधीच बनवणार नाही, असं म्हणणं उचित नाही. एखादी कल्पना डोक्यात आली आणि ती 'रॉकस्टार २'साठी चांगली असेल तर सीक्वल बनवायला काय हरकत आहे. रॉकस्टारच्या सीक्वलसंदर्भात माझ्या डोक्यात एखादी अद्भूत कल्पना आली तर नक्कीच मी सीक्वलचा विचार करेन."

'रॉकस्टार' सिनेमाविषयी

२०११ साली 'रॉकस्टार' सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमात रणबीर कपूरने प्रमुख भूमिका साकारली होती. याशिवाय अभिनेत्री नर्गीस फाखरीने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या दोघांशिवाय सिनेमात पियुष मिश्रा, कुमुद मिश्रा, जयदीप अहलावत या कलाकारांची भूमिका होती. रणबीरचे आजोबा आणि दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांचा 'रॉकस्टार' हा शेवटचा सिनेमा होता. शम्मी यांनी शहनाई वादकाच्या छोट्याश्या भूमिकेत चांगलीच छाप पाडली.

Web Title: ranbir kapoor movie rockstar sequel updates by director imtiaz ali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.