रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल पार्क' सिनेमाबद्दल नवीन अपडेट समोर, वांगा यांच्यासोबत लवकरच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 13:00 IST2025-09-04T13:00:10+5:302025-09-04T13:00:45+5:30

'अ‍ॅनिमल पार्क'ची चाहत्यांमध्ये उत्सुकता

Ranbir Kapoor movie animal park new update director sandeep reddy vanga soon to start working on it | रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल पार्क' सिनेमाबद्दल नवीन अपडेट समोर, वांगा यांच्यासोबत लवकरच...

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल पार्क' सिनेमाबद्दल नवीन अपडेट समोर, वांगा यांच्यासोबत लवकरच...

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या बॉलिवूडमध्ये सर्वात आघाडीवर आहे. 'अ‍ॅनिमल'च्या यशानंतर त्याचा भाव वधारला आहे. या सिनेमातील त्याच्या इंटेन्स लूकने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या सिनेमाने रणबीरचं करिअर पुन्हा रुळावर आलं. यानंतर त्याच्याकडे सिनेमाच्या ऑफर्सची रांगच लागली. 'अ‍ॅनिमल'च्या शेवटी याच्या सीक्वेलचीही हिंट देण्यात आली होती. 'अ‍ॅनिमल पार्क'(Animal Park) असं सीक्वेलचं नाव असणार आहे. नुकतंच याबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे.

सध्या रणबीर कपूर संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' सिनेमात व्यग्र आहे. याआधी त्याने नितेश तिवारींच्या 'रामायण पार्ट १'चं शूट पूर्ण केलं आहे. तर दुसरीकडे संदीप रेड्डी वांगा प्रभाससोबत 'स्पिरीट'चं शूट करत आहेत. त्यांनी सिनेमासाठी ६ महिन्यांचा प्लॅन तयार केला आहे. प्रभासच्या लूकमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. तो वजन कमी करणार असून हेअरस्टाईलमध्येही बदल करणार आहे. तसंच त्याची ड्रेसिंग स्टाईल कधीही न पाहिलेली अशी असेल. प्रभासच्या या सिनेमाचं शूटिंग एक शेड्युलमध्येच पूर्ण होणार आहे. ६ महिन्याच्या आतच ते संपेल. तर इकडे लव्ह अँड वॉरचंही शेड्युल संपेल. यानंतर रणबीर आणि वांगा 'अॅनिमल पार्क'साठी दमदार प्लॅन तयार करणार आहेत. पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत सिनेमाचं काम सुरु होऊ शकतं अशी चर्चा आहे. मेकर्सकडून अद्याप कोणतंही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही.

'अ‍ॅनिमल पार्क' मध्ये रणबीर कपूर हिरो आणि खलनायक अशा डबल रोलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. तसंच तृप्ती डिमरीही सिनेमाचा महत्वाचा भाग असेल. बॉबी देओल पार्ट २ मध्ये दिसणार नाही कारण त्याचा पहिल्याच पार्टमध्ये मृत्यू दाखवण्यात आला. तसंच रश्मिकाबद्दल अद्याप काहीही अपडेट आलेलं नाही. 'अॅनिमल' सिनेमाने ९०० कोटी कमावले होते. मात्र तेवढीच सिनेमावर टीकाही झाली होती. सलग फ्लॉप सिनेमांनंतर रणबीरला 'अॅनिमल' सिनेमानेच तारलं होतं. आता त्याच्या आगामी सर्वच सिनेमांची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Web Title: Ranbir Kapoor movie animal park new update director sandeep reddy vanga soon to start working on it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.