रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'ची विदेशातही क्रेझ, प्रदर्शनाआधीच अॅडव्हान्स बुकिंगमधून हजारो तिकिटांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 15:09 IST2023-11-16T15:08:55+5:302023-11-16T15:09:07+5:30
रणबीरच्या 'अॅनिमल' चित्रपटाची क्रेझ परदेशातही पाहायला मिळत आहे. भारताआधी हा चित्रपट परदेशात रिलीज केला जाणार आहे.

रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'ची विदेशातही क्रेझ, प्रदर्शनाआधीच अॅडव्हान्स बुकिंगमधून हजारो तिकिटांची विक्री
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ट्रेलरमध्ये रणबीरचा लूक पाहून चाहत्यांची 'अॅनिमल'बाबत उत्सुकता वाढली आहे. नुकतंच या चित्रपटातील रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांचं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रणबीरच्या 'अॅनिमल' चित्रपटाची क्रेझ परदेशातही पाहायला मिळत आहे. भारताआधी हा चित्रपट परदेशात रिलीज केला जाणार आहे.
१ डिसेंबर 'अॅनिमल' सिनेमा देशात प्रदर्शित होणार आहे. तर ३० नोव्हेंबरला हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' सिनेमासाठी परदेशात अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. 'ईटाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेत अॅनिमल सिनेमा तब्बल ८८८ स्क्रीनवर प्रदर्शित केला जाणार आहे. 'जवान', 'पठाण', 'टायगर ३' आणि रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटांपेक्षा हा आकडा जास्त आहे. रणबीरच्या अॅनिमलला परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची आत्तापर्यं. ११०० तिकिटांची विक्री झाली आहे.
रणबीर कपूरबरोबर 'अॅनिमल' सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील त्यांचं रोमँटिक गाणंही व्हायरल झालं आहे. सध्या रणबीर 'अॅनिमल' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. भारत-न्यूझीलंड वर्ल्डकप सेमी फायनल दरम्यानही वानखेडे स्टेडियममध्ये त्याने हजेरी लावली होती. यावेळी रणबीरने 'अॅनिमल' असं लिहिलेली इंडियाची जर्सी घातली होती.