रणबीर कपूर-रश्मिकाचा लिपलॉक, पहिल्या गाण्याचं पोस्टर रिलीज; Animal ची उत्सुकता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 11:00 IST2023-10-10T10:59:13+5:302023-10-10T11:00:12+5:30
Animal मध्ये रणबीर कपूर आणि रश्मिकाची इंटेन्स लव्हस्टोरी असल्याचं दिसतंय.

रणबीर कपूर-रश्मिकाचा लिपलॉक, पहिल्या गाण्याचं पोस्टर रिलीज; Animal ची उत्सुकता वाढली
रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आगामी बहुप्रतिक्षित सिनेमा Animal ची उत्सुकता वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचं टीझर रिलीज झालं. यामध्ये रणबीर अतिशय अंग्री लुकमध्ये दिसत आहे. लांब केस, वाढलेली दाढी आणि शर्टलेस अवतारात तो अॅक्शन करताना दिसतोय. टीझरच्या पहिल्याच सीनमध्ये रश्मिकावर तो चिडताना दिसतो. त्यामुळे हा सिनेमा फुल व्हायलेंसने भरलेला असणार हे नक्की. उद्या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज होतंय. गाण्याचं पोस्टर आऊट झालं असून यामध्ये रणबीर आणि रश्मिका लिपलॉक करताना दिसत आहेत.
Animal मध्ये रणबीर कपूर आणि रश्मिकाची इंटेन्स लव्हस्टोरी असल्याचं दिसतंय. उद्या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज होत आहे. 'हुआ मै' असं गाण्याचं टायटल आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने गाण्याचं पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. यामध्ये रणबीर आणि रश्मिका प्लेनमध्ये पायलट सीटवर बसलेले दिसत आहेत. दोघांचा लिपलॉक करतानाचा हा फोटो आहे. गाण्याचं पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
'अॅनिमल' हा सिनेमा 'कबीर सिंग' फेम दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे. यामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओलची भूमिका आहे. बॉबी यामध्ये खलनायकाचे पात्र साकारतोय. १ डिसेंबरला सिनेमा सगळीकडे प्रदर्शित होतोय.