आलिया-रणबीर यांच्या २४० कोटींच्या नव्या बंगल्याचा Video समोर, लवकरच होणार गृहप्रवेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 18:31 IST2025-08-25T18:31:31+5:302025-08-25T18:31:39+5:30
हे घर आलिया आणि रणबीरसाठी खूप खास आहे, कारण हा कपूर कुटुंबाचा वारसा आहे.

आलिया-रणबीर यांच्या २४० कोटींच्या नव्या बंगल्याचा Video समोर, लवकरच होणार गृहप्रवेश!
Alia Bhatt and Ranbir Kapoor House Video: बॉलिवूडची लोकप्रिय स्टार जोडी अर्थात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhat) प्रचंड चर्चेत असतात. दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे अनेकदा दिसून आलं आहे. दोघेही चाहत्यांना कपल्स गोल देताना दिसतात. ही लोकप्रिय जोडी सध्या त्याच्या नव्या बंगल्यामुळे चर्चेत आहेत. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या घराचं काम आता पूर्ण होत आलं आहे. या घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा आलिशान बंगला पाहून चाहते थक्क झाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, सहा मजली बंगल्याची एक झलक दिसते. समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असलेला हा बंगला अत्यंत भव्य आणि सुंदर दिसतोय. घराच्या सजावटीकडे रणबीर आणि आलियाने स्वतः लक्ष दिलं होतं. प्रत्येक मजल्यावरील बाल्कनीमध्ये झाडे लावण्यात आली आहे. रणबीर-आलियाच्या या नव्या घराच्या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. त्यांच्या ड्रीम होमची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हे घर आलिया आणि रणबीरसाठी खूप खास आहे, कारण हा कपूर कुटुंबाचा वारसा आहे. सुरुवातीला रणबीरचे आजोबा राज कपूर आणि आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावावर असलेले हे घर नंतर ऋषी आणि नीतू कपूर यांना मिळाले होते. आता या दाम्पत्याने हा वारसा रणबीर आणि आलियाला दिला आहे. या बंगल्याची किंमत तब्बल २४० कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.
Ranbir Kapoor’s new bungalow simple and elegant ✨ pic.twitter.com/dkfaLYrkmH
— 𝓐𝔂𝓪𝓷 🚩 (@behind_you_rk) August 23, 2025
आलिया आणि रणबीरची लव्हस्टोरी
आलिया आणि रणबीर यांनी अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर त्यांनी लेक राहाचं स्वागत केलं. आता त्यांच्या या नव्या आलिशान घरात लेक राहासोबत नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी ते उत्सुक आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर रणबीर आणि आलिया या घरात शिफ्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.