Ranbir Alia Wedding: आलियाच्या लग्नावरून KRK ने सिद्धार्थ मल्होत्राची उडवली खिल्ली, बघा काय म्हणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:15 PM2022-04-14T12:15:46+5:302022-04-14T12:15:57+5:30

Ranbir Alia Wedding : मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'स्टुडंट ऑफ द इअर' दरम्यान आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू होती. पण हे नातं फार काळ टिकलं नाही.

Ranbir Alia Wedding : KRK trolls Sidharth Malhotra over Alia Bhatt wedding | Ranbir Alia Wedding: आलियाच्या लग्नावरून KRK ने सिद्धार्थ मल्होत्राची उडवली खिल्ली, बघा काय म्हणाला

Ranbir Alia Wedding: आलियाच्या लग्नावरून KRK ने सिद्धार्थ मल्होत्राची उडवली खिल्ली, बघा काय म्हणाला

googlenewsNext

Ranbir Alia Wedding: बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं आज लग्न होणार आहे. प्रत्येकांचं लक्ष त्यांच्या ग्रॅंड लग्नावर टिकून आहे. अशातच वादग्रस्त ट्विट करणारा कमाल आर खान म्हणजे केआरकेने सिद्धार्थ मल्होत्राची खिल्ली उडवली आहे.

केआरकेने आलिया भट्टच्या लग्नावरून तिचा एक्स रूमर्ड बॉयफ्रेन्ड सिद्धर्थ मल्होत्राला ट्रोल केलं. इतकंच नाही तर त्याने सिद्धार्त मल्होत्राला धोब्याचं कुत्र म्हणाला. केआकेने ट्विट केलं जे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. केआरकेने ट्विटमध्ये लिहिलं की, 'एकदा सिद्धार्थ मल्होत्राने आलिया भट्टसाठी माझ्यासोबत भांडण केलं होतं. आता आलियाने त्याला तिच्या लग्नात बोलवलं नाही. लायकी समजली ना बेटा. धोबी का कुत्ता घर का न घाट का.'

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'स्टुडंट ऑफ द इअर' दरम्यान आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू होती. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर २०१७ मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर सिद्धार्थ कियारा अडवाणीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे तर आलियाने रणबीरला डेटिंग सुरू केलं होतं.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाच्या रितीरिवाजांचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी दोघांनाही हळत लागली. आता सायंकाळी लग्न लागेल. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर आणि आलिया आज दुपारी २ वाजता सात फेरे घेतील. यावेळी जवळचे केवळ ४० ते ५० पाहुणेच उपस्थित राहतील.
 

Web Title: Ranbir Alia Wedding : KRK trolls Sidharth Malhotra over Alia Bhatt wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.