IIFA इव्हेंटमध्ये शाहरुख अन् करण जोहरच्या पाया पडला राणा दग्गुबती; म्हणाला, "आम्ही दाक्षिणात्य..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 08:53 IST2024-09-11T08:51:34+5:302024-09-11T08:53:04+5:30
साऊथ स्टार राणा दगुबत्तीच्या या कृतीचं होतंय कौतुक

IIFA इव्हेंटमध्ये शाहरुख अन् करण जोहरच्या पाया पडला राणा दग्गुबती; म्हणाला, "आम्ही दाक्षिणात्य..."
सिनेसृष्टीतील पुरस्कार सोहळ्यांपैकी एक आयफा अवॉर्ड्स २०२४ (IIFA AWARDS 2024) लवकरच पार पडणार आहे. यासंदर्भातील पत्रकार परिषद काल मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. यासाठी शाहरुख खान, करण जोहर, राणा दगुबत्ती, सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. या इव्हेंटला सर्वानीच स्टेजवर धमाल केली. शाहरुख आणि करणनेच सगळ्यांनाच त्यांच्या ह्युमरने हसवलं. दरम्यान राणा दगुबत्तीच्या एका कृतीने सर्वांचंच लक्ष वेधलं.
आयफा २०२४ च्या प्री इव्हेंटमध्ये शाहरुख खान आणि करण जोहर स्टेजवर उभे असतात. पत्रकारांशी आणि इतर उपस्थितांशी ते संवाद साधत असतात. मजा मस्ती करत असतात. नंतर साऊथ अभिनेता राणा दगुबत्तीला स्टेजवर बोलवण्यात येतं. करण आणि शाहरुख राणाची गळाभेट घेतात. पण राणाला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. 'आम्ही पूर्णत: दाक्षिणात्य आहोत त्यामुळे आम्ही हे करतो...' असं म्हणत तो शाहरुख आणि करणच्या पाया पडतो. हे पाहून शाहरुख आणि करणही हसतात आणि पुन्हा त्याची गळाभेट घेतात. राणाच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
IIFA अवॉर्ड्स २७ ते २९ सप्टेंबर पर्यंत अबूधाबीच्या यास आयलंड येथे पार पाडणार आहे. यामध्ये बॉलिवूडच नाही तर संपूर्ण साऊथ इंडस्ट्रीही सामील होणार आहे. शाहरुख खान आपल्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवणार आहे. शाहीद कपूर, जान्हवी कपूर, विकी कौशल, क्रिती सेनन आणि अभिनेत्री रेखा यांसह अनेक सेलिब्रिटी अवॉर्ड्समध्ये दिसतील.