रामचरणच्या घरातील 'या' व्यक्तीने केला घटस्फोटाचा अर्ज दाखल, कुटुंबियांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 10:48 IST2023-07-05T10:39:00+5:302023-07-05T10:48:49+5:30

एकीकडे लेकीच्या जन्माचा आनंद पण दुसरीकडे...

ramcharan sister niharika konidela files divorce case two years after marriage | रामचरणच्या घरातील 'या' व्यक्तीने केला घटस्फोटाचा अर्ज दाखल, कुटुंबियांना धक्का

रामचरणच्या घरातील 'या' व्यक्तीने केला घटस्फोटाचा अर्ज दाखल, कुटुंबियांना धक्का

साऊथ सुपरस्टार रामचरणची (Ramcharan) पत्नी उपासनाने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव कलिन कारा (Klin Kara Konidela) असं लेकीचं नामकरण केलं. गोंडस मुलीच्या जन्मानंतर रामचरणच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. पण दुसरीकडे कुटुंबातून एक वेगळीच बातमीही आता समोर आली आहे. रामचरणची चुलत बहीण निहारिका कोनिडेलाने (Niharika Konidela) घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. निहारिका आणि तिच्या पतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती.

दोन वर्षांपूर्वीच रामचरणची चुलत बहीण निहारिका लग्नबंधनात अडकली होती. चैतन्य जोनलगड्डासह तिने लग्न केले होते. मात्र दोनच वर्षात त्यांचा संसार मोडला आहे. निहारिकाने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करताच बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. निहारिका आणि चैतन्य गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे राहत आहेत. निहारिकाने कुकटपल्ली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. यामध्ये तिने जजकडे पतीला घटस्फोट देण्याची मागणी केली आहे. दोघंही परस्परसंमतीने घटस्फोट घेत आहेत.

2020 साली डिसेंबर महिन्यात निहारिका आणि चैतन्य यांचा विवाह पार पडला होता. अतिशय थाटामाटात हा विवाहसोहळा झाला होता. मात्र काही महिन्यांपासून दोघांमध्ये अनेक कारणांनी मतभेद सुरु झाले. याचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला. एकाच घरात राहणंही त्यांना पसंत पडत नव्हतं. अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

निहारिकाने एप्रिल महिन्यातच सोशल मीडियावरुन लग्नाचे आणि चैतन्यसोबतचे इतर सर्व फोटो डिलीट केले. तेव्हापासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. तिचा भाऊ वरुण तेजच्या साखरपुड्यातही ती एकटीच आली होती. तेव्हा या घटस्फोटांच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं होतं.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: ramcharan sister niharika konidela files divorce case two years after marriage