Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 11:47 IST2025-04-25T11:46:46+5:302025-04-25T11:47:28+5:30
Ramayana Movie : नितेश तिवारीचा बहुचर्चित सिनेमा 'रामायण'ची घोषणा झाली तेव्हापासून चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
नितेश तिवारी(Niteish Tiwari)चा बहुचर्चित सिनेमा 'रामायण'(Ramayana Movie)ची घोषणा झाली तेव्हापासून चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. खरेतर या भूमिकेसाठी साई पल्लवीला पहिली पसंती नव्हती. तर या रोलसाठी साउथच्या एका अभिनेत्रीला विचारण्यात आले होते. मात्र तिने ही ऑफर नाकारल्याचे समोर आले आहे. ही अभिनेत्री कोण आहे आणि तिने ही इतकी लक्षवेधी भूमिका का नाकारली असेल, यामागचे कारण जाणून घेऊयात.
'रामायण' सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून चाहते उत्साही आहेत. सिनेमात रामाच्या भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर आणि सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे. पण सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच्या आधी अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीला ऑफर देण्यात आली होती. तिने स्क्रीन टेस्टदेखील दिली होती. याबाबतचा खुलासा खुद्द तिनेच केला आहे. स्क्रीन टेस्ट देऊनही तिने या भूमिकेसाठी नकार दिला आणि यामागचे कारणही एका मुलाखतीत सांगितले.
सिद्धार्थ कन्ननसोबतच्या संवादादरम्यान श्रीनिधी शेट्टीने सांगितले की, प्रेक्षकांनी तिला केजीएफ २मध्ये अभिनेता यशसोबत पाहिलं. अशात रामायणमध्ये अगदी विरुद्ध भूमिकेत तिला प्रेक्षकांना पाहणे आवडले नसते. खरेतर रामायणमध्ये अभिनेता यश रावणची भूमिका साकारणार आहे. श्रीनिधीने नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण सिनेमाबद्दल म्हटलं की, मी रामायणसाठी स्क्रीन टेस्ट दिली होती आणि त्यांना भेटली होते. मला आठवतंय की, मी तीन खूप छान केले होते. त्यांना माझी टेस्टदेखील खूप आववडली होती. त्याचवेळी मी ऐकले की, यशदेखील रामायणचा भाग आहे. तिने पुढे म्हटले की, त्याचदरम्यान केजीएफ २ रिलीज झाली होती. यशसोबतची तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीदेखील खूप भावली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी रामायण तिच्याकडे आले.
साई पल्लवीला सीतेच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक
श्रीनिधी म्हणाली, 'मला वाटले की जर तो रावणाची भूमिका करतो आणि मी सीतेची भूमिका करतेय तर आम्ही एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध असू.' 'केजीएफ २' मध्ये लोक आम्हाला खूप प्रेमाने एकत्र पाहतील आणि नंतर त्यांना 'रामायण' मध्ये आम्हाला एकमेकांविरुद्ध पाहणे आवडणार नाही. असा विचार करून तिने ही भूमिका करण्यास नकार दिला. 'रामायण'मधील साई पल्लवीबद्दल तिने म्हटले की, ती एक उत्तम निवड आहे. चित्रपटात साईला पाहण्यासाठी ती उत्सुक आहे. 'रामायण' हा चित्रपट नोव्हेंबर २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.