नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये सनी पाजीची एन्ट्री? तारा सिंगला मिळाली हनुमानाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 09:04 AM2023-10-11T09:04:37+5:302023-10-11T09:05:11+5:30

सनी देखील हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक असल्याचं कळतंय.

ramayan nitesh tiwari s project sunny deol may play lord hanuman s role talks in btown | नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये सनी पाजीची एन्ट्री? तारा सिंगला मिळाली हनुमानाची भूमिका

नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये सनी पाजीची एन्ट्री? तारा सिंगला मिळाली हनुमानाची भूमिका

बॉलिवूडमध्ये सध्या एका प्रोजेक्टची जोरदार चर्चा आहे. निर्माते नितेश तिवारी (Nitesh Tiwari) 'रामायण' (Ramayan) या सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. यामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साऊथ अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) श्रीराम आणि सीतेच्या भूमिकेत असणार आहे. तर रावणाच्या भूमिकेत केजीएफ स्टार यश असल्याची चर्चा आहे. २०२४ च्या जुलैमध्ये सिनेमाचं शूट सुरु होणार आहे. दरम्यान हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलचं (Sunny Deol) नाव समोर येत आहे.

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, नितेश तिवारी सध्या सनी देओलशी हनुमानाच्या भूमिकेसाठी चर्चा करत आहेत. हनुमान शक्तीचं प्रतीक आहे  आणि या भूमिकेला सनी देओलच योग्य न्याय देऊ शकतो असं मेकर्सचं मत आहे. सनी देखील हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक असल्याचं कळतंय. सध्या फक्त चर्चा सुरु आहेत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

याशिवाय नितेश तिवारी हे मधु मंटेना, अल्लू अरविंग आणि नमित मल्होत्रा यांच्यासह हनुमानावर एक स्टँडअलोन फिल्म बनवण्याच्याही विचारात आहेत. रामायण हे भगवान हनुमानाच्या जीवनातील छोटा भाग आहे. त्यांच्या कहाणीला आणखीही अनेक पैलू आहेत. नितेश यांना हेच पैलू मोठ्या पडद्यावर उलगडायचे आहेत. 

आतापर्यंत रामायणावर अनेक मालिका, चित्रपट आले. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा रामायणावरच आधारित होता. मात्र हा सिनेमा फारसा चालला नाही. त्यातील डायलॉग्समुळे तो ट्रोलही झाला. रामायणावर आधारित  असलेली रामानंद सागर यांची टेलिव्हिजन मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. त्या मालिकेला नितेश तिवारी टक्कर देऊ शकतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Web Title: ramayan nitesh tiwari s project sunny deol may play lord hanuman s role talks in btown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.