राम रहीमची वॉन्टेड मुलगी हनीप्रीतला ‘या’ सुपरस्टारसोबत करायचा होता रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:01 IST2017-09-12T07:49:43+5:302017-09-12T14:01:50+5:30

बलात्कारी बाबा राम रहीम याची मानलेली मुलगी हनीप्रीत सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण पोलीस तिच्या मागावर असून, ती भारतातून ...

Ram Rahim's wanted daughter Honeypreet wanted to do this superstar with Romance! | राम रहीमची वॉन्टेड मुलगी हनीप्रीतला ‘या’ सुपरस्टारसोबत करायचा होता रोमान्स!

राम रहीमची वॉन्टेड मुलगी हनीप्रीतला ‘या’ सुपरस्टारसोबत करायचा होता रोमान्स!

ात्कारी बाबा राम रहीम याची मानलेली मुलगी हनीप्रीत सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण पोलीस तिच्या मागावर असून, ती भारतातून पळून जाण्याच्या तयारीत आहे. राम रहीमचा पर्दाफाश झाल्यानंतर हनीप्रीतचा पोलीस शोध घेत असून, तिच्याकडून बरीचशी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. असो, हनीप्रीतविषयी सांगायचे झाल्यास, ती नेहमीच राम रहीमसोबत बघावयास मिळत असे. राम रहीमप्रमाणे तिलाही ग्लॅमरच्या दुनियेचे आकर्षण राहिले आहे. वास्तविक तिला बॉलिवूडमध्ये अभिनेत्री व्हायचे होते. तिचे पूर्वीपासूनच बॉलिवूडच्या एका सुपरस्टारसोबत काम करण्याचे स्वप्न होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा सुपरस्टार आहे तरी कोण?



हनीप्रीत राम रहीमची मानलेली मुलगी आहे. तिला बॉलिवूडचे आकर्षण कसे होते, याबाबतचा खुलासा राम रहीमचे नातेवाईक भुविंदर सिंग गोरा यांनी केला आहे. हनीप्रीतचे बॉलिवूड कनेक्शन कसे होते, याबाबतचे अनेक धक्कादायक खुलासे गोरा यांनी केले आहेत. भुविंदरने दावा केला की, हनीप्रीतला बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षयकुमार याच्यासोबत काम करायचे होते. त्याची हिरोइन बनण्यासाठी ती खूपच प्रयत्नशील होती. विशेष म्हणजे यासाठी तिने अक्षयकुमारची बºयाच वेळा भेटही घेतल्याचे समजते.  



भुविंदर सिंग गोराने आणखी खुलासे करताना म्हटले की, हनीप्रीत आणि बलात्कारी बाबा राम रहीम अक्षयकुमारसोबत चित्रपट बनविण्याचा प्रयत्न करीत होते. यावर स्वत: राम रहीमने काम केल्याचेही गोरा यांनी सांगितले. वास्तविक राम रहीमलाच हनीप्रीतने फिल्मी दुनियेत आणले. तिचे बॉलिवूडशी जबरदस्त कनेक्शन राहिले आहे. इंडस्ट्रीतील अनेक बड्या स्टार्ससोबत तिची जबरदस्त मैत्री राहिली आहे. यावेळी भुविंदर सिंग गोराने दावा केला की, हनीप्रीतची जीवलग मैत्रिण शिल्पा शेट्टी कित्येकदा राम रहीमच्या डेºयात आली होती. 



असो, सध्या पोलीस हनीप्रीतचा शोध घेत असून, ती फरार आहे. ती भारताबाहेर नेपाळमार्गे पळून जाण्याच्या तयारीत असल्याने या परिसरात जागोजागी तिचे पोस्टर लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर हनीप्रीतचे अनेक किस्से सध्या सोशल मीडियावरही चर्चिले जात आहेत. हनीप्रीत आणि अक्षयकुमारच्या भेटीबद्दल बोलायचे झाल्यास, अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना सुरुवातीपासूनच राम रहीमची कट्टर विरोधक राहिली आहे. अशात अक्षय राम रहीम आणि हनीप्रीतपासून दूरच राहिला असेल असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. 

Web Title: Ram Rahim's wanted daughter Honeypreet wanted to do this superstar with Romance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.