सासऱ्यांबद्दल प्रश्न ऐकताच रकुल प्रीत सिंहला राग अनावर, 'सॉरी' म्हणत गेली निघून; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 13:30 IST2024-09-30T13:29:38+5:302024-09-30T13:30:46+5:30

सुरुवातीला अभिनेत्री रकुल प्रीत सिंह पत्रकारांच्या प्रश्नांवर शांततेत उत्तरं देत होती. मात्र...

Rakul Preet Singh shocking reaction after heard question about her father in law | सासऱ्यांबद्दल प्रश्न ऐकताच रकुल प्रीत सिंहला राग अनावर, 'सॉरी' म्हणत गेली निघून; Video व्हायरल

सासऱ्यांबद्दल प्रश्न ऐकताच रकुल प्रीत सिंहला राग अनावर, 'सॉरी' म्हणत गेली निघून; Video व्हायरल

रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) बॉलिवूड आणि दाक्षिणात्य दोन्ही सिनेसृष्टीत काम करणारी अभिनेत्री. काही महिन्यांपूर्वीच तिने प्रसिद्ध निर्माता जॅकी भगनानीसोबत लग्नगाठ बांधली. जॅकी हा निर्माते वासू भगनानी यांचा मुलगा आहे. सध्या वासू भगनानी पैसे थकवल्याप्रकरणी चर्चेत आहेत. नुकतंच आयफा पुरस्कार सोहळ्याआधी पत्रकारांशी बातचीत करताना रकुल प्रीत सिंहला सासऱ्यांवरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर ती प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन निघून गेली.

सुरुवातीला अभिनेत्री रकुल प्रीत सिंह पत्रकारांच्या प्रश्नांवर शांततेत उत्तरं देत होती. मात्र एका पत्रकाराने तिला वासू भगनानी यांच्या आर्थिक व्यवहाराप्रकरणी प्रश्न विचारला. पत्रकाराचा प्रश्न पूर्ण न ऐकताच रकुल सॉरी म्हणत तिथून सरळ निघून गेली. तिचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत तिला Rude म्हटले आहे. 'तिला उत्तर द्यायचं नव्हतं तर नो कमेंट्स तरी म्हणायचं' अशी कमेंट एकाने केली आहे.


नेमकं प्रकरण काय?

वासू भगनानी यांच्यावर बडे मिया छोटे मिया सिनेमाचे पैसे न दिल्याचा आरोप आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी भगनानींविरोधात डायरेक्टर असोसिएशनकडे तक्रार दाखल केली आहे आणि पैशांची मागणी केली आहे. त्यांनी दावा केला आहे की वासू भगनानी यांनी तब्बल ७.३० कोटी रुपये थकवले आहेत. यानंतर असोसिएशनने पत्र लिहीत वासू भगनानी यांची बाजू मांडायला सांगितली. याउलट वासू भगनानी आणि जॅकीने अली अब्बास यांच्याविरोधात शूटिंगवेळी अबू धाबीतील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सबसिडीचे पैसे हडपल्याचा आरोप केला आहे. दिग्दर्शकाला लवकरच बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात येणार आहे.

Web Title: Rakul Preet Singh shocking reaction after heard question about her father in law