रकुलने लग्नाआधी जॅकीसमोर ठेवली होती 'ही' अट, म्हणाली - "मी लग्न करेन पण…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 12:49 IST2024-05-16T12:46:01+5:302024-05-16T12:49:22+5:30

रकुल आणि जॅकी यांची लव्हस्टोरी लॉकडाऊनमध्ये सुरू झाली होती.

Rakul Preet Singh Reveals She "Forced" Jackky Bhagnani To Propose To Her Before Wedding | रकुलने लग्नाआधी जॅकीसमोर ठेवली होती 'ही' अट, म्हणाली - "मी लग्न करेन पण…"

रकुलने लग्नाआधी जॅकीसमोर ठेवली होती 'ही' अट, म्हणाली - "मी लग्न करेन पण…"

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी ही बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. अलिकडेच दोघांचा शाही विवाहसोहळा गोव्यात पार पडला.  पंजाबी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने रकुल-जॅकी यांचा विवाह झाला. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूडसेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रकुल आणि जॅकी यांची लव्हस्टोरी लॉकडाऊनमध्ये सुरू झाली होती. मात्र लग्न करण्याआधी रकुलने जॅकीसमोर एक अट ठेवली होती.

लग्नानंतर नुकतेच रकुलने झूमला मुलाखत दिली. यावेळी तिनं लग्नाविषयी एक गोष्ट सांगितली आहे. लग्नापूर्वी जॅकीसमोर एक अट ठेवली होती, असं रकुलने सांगितलं. रकुल म्हणाली की, 'आमच्या प्रपोजलची स्टोरी कोणालाच माहित नाहीये. मी त्याला खूप फोर्स केलं होतं की, जर त्याने प्रपोज नाही केलं तर मी लग्न करणार नाही आणि तेव्हा लग्नाची तयारी सुरु झाली होती'. मी त्याला म्हटलं, 'तुझ्याकडे फक्त दोन-तीन महिने आहेत, तुला प्रपोज करावं लागेल, विचार कर'. पण, जॅकीने भूमी सोबत बॅचलर पार्टी अरेंज केलीय याची मला काही कल्पनाचं नव्हती. जॅकीने सरप्राईज दिलं आणि २०-२५ लोकांसमोर प्रपोजसुद्धा केल्याचं रकुलने सांगितलं. 

जॅकी आणि रकुलची प्रेमकहाणी खूप रंजक आहे. दोघेही एकमेकांचे शेजारी होते, पण कधीच बोलले नव्हते. लॉकडाऊन दरम्यान दोघे कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून भेटले. त्यानंतर दोघांच्या मैत्रीतील प्रेमात रूपांतर झालं. जॅकी आणि रकुल यांनी जवळपास तीन-चार महिने एकत्र वेळ घालवला आणि दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. 
 

Web Title: Rakul Preet Singh Reveals She "Forced" Jackky Bhagnani To Propose To Her Before Wedding