Rakul Preet Singh : जबरदस्त मेहनत! अडीच मिनिटांच्या सीनसाठी अभिनेत्रीने घेतली सर्वात मोठी जोखीम, पाण्याखाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 12:38 IST2023-06-11T12:09:22+5:302023-06-11T12:38:43+5:30
Rakul Preet Singh : रकुल प्रीत सिंहने केवळ 2 मिनिटे 30 सेकंदाच्या एका सीनसाठी एवढी जोखीम पत्करली आहे, जे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

Rakul Preet Singh : जबरदस्त मेहनत! अडीच मिनिटांच्या सीनसाठी अभिनेत्रीने घेतली सर्वात मोठी जोखीम, पाण्याखाली...
गेल्या काही काळापासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेली रकुल प्रीत सिंह सध्या तिच्या नव्या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. तिच्या ‘आय लव्ह यू’ या चित्रपटाचा टीझर आला असून तो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा चित्रपट एक थ्रिलर आहे आणि रकुल प्रीत सिंहने केवळ 2 मिनिटे 30 सेकंदाच्या एका सीनसाठी एवढी जोखीम पत्करली आहे, जे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
एका सीनमध्ये रकुलला पाण्याखाली राहावं लागलं. या सीनसाठी रकुलने एवढी जबरदस्त तयारी केली, हे ऐकणारे सगळेच आश्चर्यचकित होतात. रकुलने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात कथेतील भावना खोलवर समजून घेण्यासाठी मला एका विशेष प्रकारच्या विचारसरणीची गरज होती. खऱ्या अर्थाने त्याच्याशी जोडण्यासाठी मी महिनाभराची मेहनतही केली. अंडरवॉटर सीक्वेंन्ससाठी जहान एडेनवाला हे माझे इंस्ट्रक्टर होते. त्यांनी मला जास्तीत जास्त दोन मिनिटे आणि 30 सेकंद पाण्याखाली राहण्याचे प्रशिक्षण दिले.
अडीच मिनिटांच्या या एका दृश्यासाठी मी महिनाभर रोज सराव केला. रकुलने पुढे सांगितले की, अंडरवॉटर सीक्वेन्स शूट करण्याचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे मी दुपारी 2 ते पहाटे 4 वाजेपर्यंत पाण्यात होतो आणि मी दिवसभर भिजले होते आणि पाणी खूप थंड होतं. साधारणपणे, अंडरवॉटर शूटिंग खूप आव्हानात्मक असते कारण त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो.
रकुलने सांगितले की, शूटिंगदरम्यान मी बाहेर येताच युनिटचे लोक प्रत्येक शॉटनंतर माझ्यावर गरम पाणी टाकत होते जेणेकरून माझे शरीर जास्त थंड होऊ नये. साहजिकच पाण्यातील क्लोरीनमुळे डोळ्यात जळजळ होते आणि तेही एक आव्हान होतं. पण मी आव्हानाचा आनंद लुटला कारण त्यामुळे मला स्वतःला पुढे नेण्यास खूप मदत झाली. आय लव्ह यू 16 जून रोजी OTT जिओ स्टुडिओवर रिलीज होत आहे. निखिल महाजन यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात रकुल प्रीत सिंगसोबत पावेल गुलाटी, अक्षय ओबेरॉय आणि किरण कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.