पाक अभिनेत्री हानिया आमिरला पाठिंबा देणं राखीला पडलं महागात, ठरली टीकेची धनी; नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 10:22 IST2025-06-27T10:19:32+5:302025-06-27T10:22:25+5:30

पाक अभिनेत्री हानिया आमिरला पाठिंबा करणं राखीला पडलं महागात, ठरली टिकेची धनी; नेटकरी म्हणाले... 

rakhi sawant support pakistani actress hania aamir watch to appealed to people sardaarji 3 netizens angry | पाक अभिनेत्री हानिया आमिरला पाठिंबा देणं राखीला पडलं महागात, ठरली टीकेची धनी; नेटकरी म्हणाले...

पाक अभिनेत्री हानिया आमिरला पाठिंबा देणं राखीला पडलं महागात, ठरली टीकेची धनी; नेटकरी म्हणाले...

Rakhi Sawant Supports Hania Aamir :बॉलिवूड अभिनेता दिलजीत दोसांझची (Diljit Dosanjh) प्रमुख भूमिका असलेला सरदारजी-३ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून, तो चर्चेचा विषय बनला. त्याचं कारण म्हणजे पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर (Hania Amir)दिलजीतसोबत रोमान्स करताना दिसत आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे दरम्यान, त्यामुळे 'सरदारजी-३' च्या प्रदर्शात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशातच संपूर्ण भारतातून सिनेप्रेमी या चित्रपटावर संताप व्यक्त करत असताना अभिनेत्री राखी सावंतने मात्र हानिया आमिरला पाठिंबा दिला आहे. 


दरम्यान, 'सरदार जी-३' चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यात पाक अभिनेत्रीला पाहून प्रेक्षकांनी दिलजीतला खूप ट्रोल केलं. त्यात आता राखी सावंतने हानिया आमिरचं समर्थन करत सोशल मीडियावर तिचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर व्हिडीओला कॅप्शन देत तिने लिहलंय की, "प्रत्येकाने हा चित्रपट जरुर पाहावा. हानिया आमिर 'सरदारजी ३' मधून पदार्पण करत आहे. सर्वांनी तिचे कौतुक करावं. ती माझी आवडती आहे. अल्लाह तुला आशीर्वाद देवो." परंतु पाक अभिनेत्रीला पाठिंबा देणं राखी सावंतला महागात पडलं आहे. 

सोशल मीडियावर राखी सावंतचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. शिवाय तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात येत आहे. "प्रमोट करायला पैसे मिळालेत का?", "बायकॉट राखी...", "किती पैसे मिळाले?" अशा कमेंट्स करत नेटकरी आगपाखड करत आहेत. 

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी

खरं तर, एप्रिल २०२५ मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला होता. त्यानंतर, पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली. अशा परिस्थितीत, हानिया आमिरला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त आलं होतं.  तथापि, चित्रपट निर्मात्यांकडून अद्याप यावर कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

Web Title: rakhi sawant support pakistani actress hania aamir watch to appealed to people sardaarji 3 netizens angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.