धिक्कार असो अशा मंत्र्यांचा, सोनू किंवा सलमानला पंतप्रधान बनवा...! राखी सावंत संतापली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 13:06 IST2021-05-11T13:03:10+5:302021-05-11T13:06:05+5:30
Rakhi Sawant Video : आम्हाला तुमची भाषणबाजी नको. आम्हाला व्हॅक्सिन हवी, आम्हाला बेड्स हवेत, आम्हाला ऑक्सिजन हवा’, असे राखी म्हणाली.

धिक्कार असो अशा मंत्र्यांचा, सोनू किंवा सलमानला पंतप्रधान बनवा...! राखी सावंत संतापली
कोरोनाची दुसरी लाट लोकांच्या जीवावर उठली आहेत. रोज हजारो लोक जीव गमवत आहेत. लोक हवालदिल झाले आहेत. साहजिकच देशातील ही स्थिती बघता, सरकारबद्दल असंतोष आहेत. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक लोक सरकारवर टीका करत आहेत. राखी सावंत (Rakhi Sawant) त्यापैकीच एक.
कोरोना काळात राजकीय मंडळींचा नाकर्तेपणा पाहून राखी सावंत कमालीची भडकली. इतकेच नाही तर सोनू सूद किंवा सलमान खान यापैकी एकाला देशाचा पंतप्रधान बनण्याची मागणीही तिने केली. (Rakhi Sawant slam government over corona pandemic)
‘देशाच्या जनतेकडे लक्ष न देणा-या राजकारण्यांचा धिक्कार असो. ज्या लोकांनी तुम्हाला इतक्या विश्वासाने निवडून दिले, त्याच लोकांकडे तुम्ही अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे. स्वत: अमेरिकेत जाऊन तुम्ही व्हॅक्सिन घेतली आणि लोकांना वा-यावर सोडले. देश चालवणे म्हणे काय? फक्त बाता मारणे? तुमच्या हातात सत्ता आहे. तुम्ही कुठूनही ऑक्सिजन आणू शकता. मी तर म्हणेल, सोनू सूदला देशाचा पंतप्रधान केले पाहिजे. सलमान खानला बघा, तो सुद्धा किती मदत करतोय. त्याला पंतप्रधान बनवा. मंत्री तर सध्या केवळ डिबेट करत आहेत. आम्हाला तुमचे डिबेट नको. आम्हाला तुमची भाषणबाजी नको. आम्हाला व्हॅक्सिन हवी, आम्हाला बेड्स हवेत, आम्हाला ऑक्सिजन हवा’, असे राखी म्हणाली.
अन् रडली...
राजकारण्यांवर बससत असताना अचानक राखी सावंत रडायला लागली. देशाची स्थिती भीषण आहे. लोकांचे जीव जात आहेत. मी रात्ररात्रभर झोपू शकत नाहीये. मी स्वत: देशाची स्थिती बघतेय. लोक किड्यामुंग्यासारखे मरत आहेत. ही तर दुसरी लाट आहे. आता तिसरी लाट येणार आहे. ती लहान मुलांवर येणार आहे. त्या आईबापांची काय स्थिती होणार? असे म्हणून राखीला अश्रू आवरत नाही.