'ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?'; ऊर्फीचं यश पाहून राखीचा होतोय तिळपापड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 14:23 IST2022-08-31T14:22:45+5:302022-08-31T14:23:22+5:30

Rakhi sawant: 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रणवीर सिंहने ऊर्फीला फॅशन आयकॉन म्हटलं होतं. तेव्हापासून ती चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. मात्र, तिचं हे लाइमलाइटमध्ये येणं राखी सावंतला जराही रुचलेलं नाही.

rakhi sawant says i got urfi javed in media urfi javed fashion bigg boss | 'ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?'; ऊर्फीचं यश पाहून राखीचा होतोय तिळपापड

'ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?'; ऊर्फीचं यश पाहून राखीचा होतोय तिळपापड

विचित्र फॅशन आणि अतरंगी स्टाइल यामुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे ऊर्फी जावेद (urfi javed). कायम रिव्हिलिंग ड्रेस परिधान केल्यामुळे ऊर्फी ट्रोल होत असते. मात्र, अलिकडेच 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रणवीर सिंहने (ranveer singh) ऊर्फीला फॅशन आयकॉन म्हटलं होतं. तेव्हापासून ती चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. मात्र, तिचं हे लाइमलाइटमध्ये येणं राखी सावंतला (rakhi sawant) जराही रुचलेलं नाही. त्यामुळे राखीने ऊर्फीवर ताशेरे ओढले आहेत.

अलिकडेच एका मुलाखतीत राखीने ऊर्फीच्या फॅशनसेन्सवर कमेंट केली आहे. विशेष म्हणजे या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असूनही राखीने ऊर्फीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. "मला ती कॉपी करते आणि माझ्याचमुळे ऊर्फी प्रकाशझोतात आलीये", असं वक्तव्य राखीने केलं आहे.

"उर्फी सध्या मला कॉपी करतीये असं दिसून येतं. सध्या तिने करिअरमध्ये चांगली उंची गाठली आहे. ती खरंच एक चांगली फॅशन आयकॉन आहे. पण, तिला मीडियासमोर आणणारी मीच आहे. नाही तर यापूर्वी ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?"

दरम्यान, राखीचं हे वक्तव्य ऐकल्यावर नेटकऱ्यांनी तिलाच ट्रोल करण्यास सुरुवात केली. कोणीही प्रकाशझोतात आलं की तू लगेच त्यांचं क्रेडिट घ्यायला येतेस, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, अलिकडेच ऊर्फीने इन्स्टावर आस्क मी एनीथिंग हे सेशन ठेवलं होते. यात तिची तुलना राखीसोबत केल्यामुळे ती संतापली होती. 
 

Web Title: rakhi sawant says i got urfi javed in media urfi javed fashion bigg boss