Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 14:01 IST2025-12-18T14:00:36+5:302025-12-18T14:01:06+5:30
Rakhi Sawant And Nitish Kumar : एका लेटेस्ट व्हिडिओमध्ये राखी बुरखा खेचण्यावरून सुरू झालेल्या वादावरून नितीश कुमारांवर चांगलीच संतापली आहे.

Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या विधानामुळे चर्चेत आली आहे. एका लेटेस्ट व्हिडिओमध्ये राखी बुरखा खेचण्यावरून सुरू झालेल्या वादावरून नितीश कुमारांवर चांगलीच संतापली आहे. राखीने सुरुवातीला नितीश कुमारांचं कौतुक केलं आणि त्यानंतर प्रचंड संतापली. "मित्रांनो नमस्कार, नितीश कुमारजी नमस्कार, तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या. नितीश कुमारजी, मी तुमची खूप मोठी फॅन आहे, तुमचा आदर करते, तुमच्यावर प्रेम करते. तुम्ही खूप चांगले नेते आहात, चांगले वडील आणि पती आहात, पण नितीशजी हे तुम्ही काय केलंत?"
"तुम्ही एका मुस्लिम महिलेला पुरस्कार देत आहात, तिला सन्मानित करत आहात, तिचा आदर करत आहात. पण तुम्हाला ५ पैशांचं तरी ज्ञान नाही का की इस्लाममध्ये महिला बुरखा घालून जातात. त्या महिलेच्या बुरख्याला कोणीही हात लावू शकत नाही. तुम्ही एवढे दिग्गज नेते, युपीचे माननीय मुख्यमंत्री, मी तुमचा आदर करते, पण तुम्ही हे काय केलंत?
"मी तुमचं धोतर खेचलं तर कसं वाटेल?"
"एका मुस्लिम महिलेचा तुम्ही बुरखा ओढत आहात, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मी तुमची पूजा करते, आदर करते, पण तुम्ही अशा गोष्टी करत आहात. जर मी तुमच्या जवळ आले आणि सर्वांसमोर तुमची धोतर खेचलं, तुमच्या पायजम्याची नाडी ओढली, तर तुम्हाला कसं वाटेल? एकीकडे तुम्ही महिलेला सन्मान देता आणि दुसरीकडे तिचा अपमान करता, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही माझे आवडते नेते आहात, पण एका मुस्लिम महिलेसोबत तुम्ही हे काय केलंत?"
"तुम्ही माफी मागा"
"नितीशजी, तुम्ही मीडियाला बोलावा आणि त्या महिलेला बहीण मानून तिची माफी मागा. मी तुमचा, युपी आणि बिहारचा आदर करते, पण महिलेवर असा अत्याचार आम्ही सहन करणार नाही. तुम्ही माफी मागा" असं राखी सावंतने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. याच दरम्यान नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री असताना राखीने त्यांना युपीचे मुख्यमंत्री म्हटल्यामुळे ती आता सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे.