Rakhi Sawant : Video - "माझ्या आयुष्यातील रंग संपले, आता काय?"; राखीचा नवा ड्रामा, ढसाढसा रडली, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 12:07 IST2023-03-07T11:59:48+5:302023-03-07T12:07:52+5:30
Rakhi Sawant : राखीने चाहत्यांना त्यांच्या आयुष्यात खूप आनंद आणि रंग भरावेत अशी शुभेच्छा दिल्या

Rakhi Sawant : Video - "माझ्या आयुष्यातील रंग संपले, आता काय?"; राखीचा नवा ड्रामा, ढसाढसा रडली, म्हणाली...
ड्रामा क्वीन राखी सावंत दुबईहून परतल्यानंतर मुंबई विमानतळावर दिसली. अभिनेत्रीने दुबईमध्ये तिची डान्स एकॅडमी उघडली आहे. एअरपोर्टवर पापाराझींसोबतच्या संभाषणात राखीने खुलासा केला की तिला दुबईत नवीन घर आणि कार मिळाली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, तिने पती आदिल खान दुर्रानी याच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला होता ते ठिकाण पाहून प्रतिक्रिया दिली. अभिनेत्री भावूक झाली.
राखी सावंत एअरपोर्टवर ब्लॅक जिम वेअरमध्ये दिसली होती. पापाराझीसमोर, अभिनेत्री तिची दिवंगत आई आणि आदिलबद्दल बोलली आणि भावूक झाली. राखीचा हा व्हिडीओ प्रसिद्ध फोटोग्राफरने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, ती दुबईमध्ये तिची डान्स एकॅडमी सुरू करण्याबद्दल बोलत आहे आणि म्हणते, "तिथे एक घर घेतलं आहे. गाडी घेतली, माझ्या कंपनीने मला ते दिलं आहे. पण ती मध्येच थांबली आणि गेल्या वर्षी जुलैमध्ये आदिलवर जिथे गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला होता त्या जागेकडे लक्ष वेधून ती रडली. आदिलने प्रेयसीला सांगितलं की हे सर्व नाटक आहे.
दुसर्या व्हिडिओमध्ये, ती आधी तिच्या आईला दुबई दाखवण्यासाठी दुबईला कशी घेऊन गेली होती याबद्दल बोलताना ती भावूक झाली, परंतु यावेळी तिची आई तिच्यासोबत नाही. काही छायाचित्रकारांनी तिला होळीच्या दिवशी तिच्या चाहत्यांसाठी एक संदेश शेअर करण्यास सांगितले, राखीने चाहत्यांना त्यांच्या आयुष्यात खूप आनंद आणि रंग भरावेत अशी शुभेच्छा दिल्या, पण पुढे म्हणाली, "माझ्या आयुष्यातील रंग संपले आहेत."
राखीचा पती आदिल खानला एफआयआर दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली होती, तिने तिच्या पैशांचा आदिलने गैरवापर केल्याचा आरोप केला होता. राखीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला होता. एका इराणी विद्यार्थिनीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर म्हैसूरमध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"