Rakhi Sawant : राखी सावंतने सर्जरीआधी रूग्णालयात केला डान्स, तुफान व्हायरल होतोय हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 14:11 IST2022-08-30T14:11:09+5:302022-08-30T14:11:24+5:30
Rakhi Sawant : राखी कुठल्याशा सर्जरीसाठी रूग्णालयात भरती झाली आहे. पण रूग्णालयातही तिला स्वस्थ बसवलं नाही. मग काय? रूग्णालयातच ती डान्स करायला लागली.

Rakhi Sawant : राखी सावंतने सर्जरीआधी रूग्णालयात केला डान्स, तुफान व्हायरल होतोय हा व्हिडीओ
इंडस्ट्रीत एंटरटेनमेंट क्वीन कुणी असेल तर ती राखी सावंत (Rakhi Sawant )आहे. परिस्थिती कुठलीही असो, राखी सावंत लोकांचं एंटरटेनमेंट करायला विसरत नाही. आता हेच बघा ना...! राखी कुठल्याशा सर्जरीसाठी रूग्णालयात भरती झाली आहे. पण रूग्णालयातही तिला स्वस्थ बसवलं नाही. मग काय? रूग्णालयातच ती डान्स करायला लागली.
लवकरच राखीची सर्जरी होणार आहे. राखीला काय झालं आहे? कशाची सर्जरी आहे? हे अद्याप कळलेलं नाही. पण आपल्या एका पोस्टमध्ये तिने सर्जरीचा उल्लेख केला आहे. सर्जरीसाठी ती रूग्णालयात भरती झाली आहे आणि रूग्णालयाच्या रूममधला डान्स व्हिडीओही शेअर केला आहे. व्हिडीओत राखीच्या हाताला ड्रिप लागलेली आहे आणि ड्रिपसोबतच ती धमाकेदार डान्स करतेय. या व्हिडीओत तिला बॉयफ्रेन्ड आदिलही तिच्यासोबत आहे. ‘कुठल्याही परिस्थितीत डान्स मला सोडत नाही, सर्जरीआधीचा डान्स,’ असं व्हिडीओ शेअर करताना राखीने लिहिलं आहे.
राखीची सर्जरी होणार आहे, ती रूग्णालयात आहे म्हटल्यावर तिचे चाहते काहीसे टेन्शनमध्ये आले आहेत. कसली सर्जरी होतेय, तुला काय झालंय, असे प्रश्न चाहते विचारत आहेत. अनेकांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आहे. क्युटी, लवकर बरी हो, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. अशीच आनंदी राहा कायम, अशी सदिच्छाही अनेक चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
राखी सध्या दुबईचा यंग बिझनेसमॅन आदिल दुर्रानीला डेट करतेय. गेल्या काही महिन्यांपासून ती सतत आदिलसोबत फिरताना दिसतेय. आदिल खान हा बिझनेसमॅन आहे आणि त्याचा कारचा बिझनेस आहे. त्यासोबतच त्याचे इतरही काही बिझनेस आहेत.
‘बिग बॉस 15’मध्ये राखीने रितेशची पती म्हणून ओळख करून दिली होती. पण ‘बिग बॉस 15’मधून बाहेर येताच राखी व रितेश यांच्या वाद सुरू झाले होते. यानंतर काही महिन्यांनी राखीच्या आयुष्यात आदिलची एन्ट्री झाली.