Rakhi Sawant : पोलिस स्टेशनमधून बाहेर येताच राखीने जोडले हात, 'निवडणुकीला उभी आहे का?' युझर्सने केले ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 08:52 IST2023-01-20T08:52:06+5:302023-01-20T08:52:51+5:30
मॉडेल शर्लिन चोप्रा हिच्या आरोपानंतर ड्रामा क्वीन राखी सावंतला काल अंबोली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

Rakhi Sawant : पोलिस स्टेशनमधून बाहेर येताच राखीने जोडले हात, 'निवडणुकीला उभी आहे का?' युझर्सने केले ट्रोल
Rakhi Sawant : मॉडेल शर्लिन चोप्रा (Sharlin Chopra) हिच्या आरोपानंतर ड्रामा क्वीन राखी सावंतला काल अंबोली (Amboli Police Station) पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा तिला सोडण्यात आले. पोलिस स्टेशनमधून बाहेर येतानाचा तिचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये प्रसिद्धीमाध्यमांच्या गर्दीतून बाहेर पडत असताना राखी सर्वांसमोर दुरुनच हात जोडत आहे. तिच्या या कृतीमुळे आता ती चांगलीच ट्रोल होत आहे.
राखी सावंत हिचे आदिल खानसोबत लग्न झाले आहे. तर दुसरीकडे राखीची आई ब्रेन ट्युमरशी झुंज देत आहे. काल राखी काळ्या रंगाचा हिजाब आणि बुरखा घालून रुग्णालयात गेली होती. सोबत तिचा पती आदिलही होता. बुरखा घातल्यामुळे ती आधीच ट्रोल होत होती. त्यात आता शर्लिन चोप्राने केलेल्या आरोपानंतर तिला अंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले. काही तास तिची चौकशीही करण्यात आली. पोलिस स्टेशनमधून बाहेर येताच राखीने हात जोडल्याने ती ट्रोल होऊ लागली.
हा व्हिडिओ पाहून युझर्स म्हणाले, 'काय निवडणूकीला उभी आहेस का?' अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसरा म्हणतो, 'इतकं काय मोठं काम केलं की हात जोडत आहे.'
पोलिस स्टेशनमधून बाहेर येताच राखी तिच्या आईला भेटायला रुग्णालयात पोहोचली. यावेळी ती म्हणाली, 'जय महाराष्ट्र, जय भारत, मी माझ्या आईला भेटायला आले आहे. डॉक्टरांचा फोन आला तिची हालत गंभीर आहे. मला चक्कर येतीए माझा बीपी लो आहे.'
राखीच्या या व्हिडिओवर युझर्स संतापले आहेत. हिची आई जीवनमृत्युशी लढा देत असताना ही काय ड्रामा करतीए अशा संतप्त कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
नेमके प्रकरण काय ?
मॉडेल शर्लिन चोप्रा हिने केलेल्या आरोपांनुसार राखीने शर्लिनचे काही गैर फोटो, व्हिडिओ व्हायरल केले होते. याविरोधात शर्लिनने तक्रार केली असता अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली,