Rakhi Sawant : राखी सावंत पुन्हा प्रेमात, त्यानेच गिफ्ट केली BMW कार; कोण आहे ‘ड्रामा क्वीन’चा नवा BF?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 13:46 IST2022-05-16T13:13:50+5:302022-05-16T13:46:03+5:30
Rakhi Sawant New Boyfriend : ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत पुन्हा प्रेमात पडलीये. होय, राखीच्या आयुष्यात नवं प्रेम आलं आहे.

Rakhi Sawant : राखी सावंत पुन्हा प्रेमात, त्यानेच गिफ्ट केली BMW कार; कोण आहे ‘ड्रामा क्वीन’चा नवा BF?
Rakhi Sawant New Boyfriend : ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा प्रेमात पडलीये. होय, राखीच्या आयुष्यात नवं प्रेम आलं आहे. ‘बिग बॉस 15’नंतर पती रितेश व राखीचं कायमचं बिनसलं. आता मात्र राखी तिच्या नव्या बॉयफ्रेन्डसोबत खूश्श आहे. राखीच्या बॉयफ्रेन्डचं नाव आदिल आहे. रविवारी एका इव्हेंटमध्ये राखीने मीडियाशी आदिलची व्हिडीओ कॉलवर भेट करून दिली.
याआधी राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत, आदिलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहिर केलं होतं. मी आता सिंगल नाहीये. मी आदिलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, असं ती म्हणाली होती. ‘ऊपर वाला देता है तो छप्पर फाडकर देता है और ईश्वरने मुझे दे दिया है. आदिल एक स्वीटहार्ट है,’ असं ती व्हिडीओत म्हणताना दिसली होती.
अन् राखीने आदिलला थेट व्हिडीओ कॉल लावला...
रविवारी राखी एका इव्हेंटमध्ये सामील झाली. यावेळी फोटोग्राफर्सनी राखीला आदिलबद्दल विचारलं. राखीने थेट आदिलला व्हिडीओ कॉलच केला आणि पापाराझींशी त्याची ओळख करून दिली. आदिल आय लव्ह यू. आयुष्यात माझ्यावर कुणी खरं प्रेम केलं असेल तर तो आदिल आहे, असं ती म्हणाली.
आदिलनेच दिली बीएमडब्ल्यू कार...
आदिलनेच राखीला बीएमडब्लू कार भेट दिली आहे. आदिल व तुझी भेट कशी झाली? हे सुद्धा तिने सांगितलं. मी डिप्रेशनमध्ये होते, तेव्हा आदिलने मला साथ दिली. मला चुकीचं काम करण्यापासून थांबवलं. आदिल आणि त्याच्या बहिणीने मला माझं मूड फ्रेश करण्यासाठी बीएमडब्ल्यू कार भेट दिली. मी छोट्या कारमध्ये फिरावं, हे त्याला आवडलं नव्हतं. फायनली, मला एक चांगला मुलगा मिळाला, असं ती म्हणाली.
याआधी राखीने रितेशची पती म्हणून ओळख करून दिली होती. ‘बिग बॉस 15’मध्ये ती रितेशसोबत सहभागी झाली होती. पण या शोमध्ये रितेश व राखीत फार काही ऑल वेल नव्हतं. शो बाहेर येताच, राखीने रितेशसोबतचं संबंध तोडल्याचं जाहिर केलं होतं. रितेश आधीच विवाहित आहे. त्यानं पहिल्या पत्नीला घटस्फोट न दिल्यामुळे आमच्या नात्यात अनेक समस्या आहे, असं ती म्हणाली होती. अनेकांच्या मते, रितेश व राखीचं लग्न निव्वळ एक ड्रामा होता.