है गर्मी!! उकाड्याने त्रस्त झालेल्या राखीने कॅमेरा पाहताच केली अशी हरकत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 18:22 IST2022-03-17T18:20:28+5:302022-03-17T18:22:12+5:30
Rakhi sawant: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राखी डान्स करताना दिसत आहे. यात अनेकदा ती कंबर लचकवते. इतकंच नाही तर ती विचित्र एक्स्प्रेशन्स आणि डान्स स्टेप्स करते.

है गर्मी!! उकाड्याने त्रस्त झालेल्या राखीने कॅमेरा पाहताच केली अशी हरकत
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सोशल मीडियावर कायम चर्चेत राहण्यासाठी काही ना काही अतरंगी उद्योग करत असते. कधी विचित्र फॅशन करुन तर कधी वादग्रस्त विधान करुन ती सातत्याने चर्चेत येण्याचा प्रयत्न करत असते. यावेळीदेखील तिने असाच काहीसा प्रकार केला आहे. मात्र, तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. सोबतच तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला राखीचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी उकाड्याने त्रस्त झाली असून ती कुलरजवळ उभी राहून वारा घेत आहे. मात्र, प्रसारमाध्यमांचे कॅमेरा तिच्याकडे फिरल्यावर ती विचित्र पद्धतीने डान्स करु लागली. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी तिला ट्रोल केलं.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राखी डान्स करताना दिसत आहे. यात अनेकदा ती कंबर लचकवते. इतकंच नाही तर ती विचित्र एक्स्प्रेशन्स आणि डान्स स्टेप्स करते.
दरम्यान, मध्यंतरी राखी तिच्या पर्सनल लाइफमुळे प्रचंड चर्चेत आली होती. बिग बॉस १५ हा शो संपल्यानंतर राखी आणि तिचा पती रितेश यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर त्यांचं सोशल मीडियावर वादही झाल्याचं पाहायला मिळालं.