कर्ज काढून 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतलं दुबईत घर; video शेअर करत दाखवली घराची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 17:08 IST2022-08-12T17:08:24+5:302022-08-12T17:08:52+5:30
Rakhi sawant: सध्या सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

कर्ज काढून 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतलं दुबईत घर; video शेअर करत दाखवली घराची झलक
कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी विदेशात आर्थिक गुंतवणूक केली आहे. यात खासकरुन विदेशात घर खरेदी करुन ही कलाकार मंडळी आर्थिक गुंतवणूक करत असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच एका बहुचर्चित राहणाऱ्या अभिनेत्रीने दुबईमध्ये तिचं स्वप्नांचं घर खरेदी केलं आहे. मात्र, हे घर घेण्यासाठी तिने कर्ज काढल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच या अभिनेत्रीने एक व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली.
वायफळ बडबड आणि सतत कॉन्ट्रोवर्सीमध्ये येणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत (rakhi sawant). अभिनेत्रीपेक्षा आयटम गर्ल म्हणून राखीला खरी प्रसिद्ध मिळाली. सोशल मीडियावर सक्रीय असलेली राखी सध्या आदिल या तिच्या नव्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत येत आहे. आदिलसोबत अलिकडेच राखीने दुबईत एक आलिशान घर घेतलं असून हे घर कर्ज काढून घेतल्याचं तिने म्हटलं आहे.
सध्या सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी तिचं दुबईतील घर दाखवत आहे. विशेष म्हणजे हे घर दाखवत असताना कर्ज काढून घर घेतल्याचं तिने सांगितलं.
राखीचं हे घर पाहिल्यावर अनेकांनी त्याची किंमत विचारली. त्यावर राखीने "मी हे घर कर्ज काढून घेतलं आहे. त्यामुळे पुढील ७ वर्ष मला घराचं कर्ज फेडायचं आहे. मला जमेल तसं मी थोडं थोडं करत हे कर्ज फेडेन", असं ती या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसते.
दरम्यान, राखी सध्या आदिल खान या व्यावसायिकाला डेट करत असल्याचं म्हटलं जातं. परंतु, आदिल्या कुटुंबाला हे नातं मान्य नाही. एका मुलाखतीमध्येही राखीने आदिलचे कुटुंबीय आमच्या नात्यामुळे नाराज असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नाही तर राखीमुळे आदिलच्या बहिणीचं लग्न ठरत नसल्याचंही तिने सांगितलं होतं.