"संपूर्ण इंडस्ट्रीने आम्हाला...", राजपाल यादवने तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर पत्नी पहिल्यांदाच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 09:35 IST2026-02-12T09:33:27+5:302026-02-12T09:35:43+5:30
Rajpal Yadav: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया समोर, बॉलिवूडबाबत म्हणाली...

"संपूर्ण इंडस्ट्रीने आम्हाला...", राजपाल यादवने तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर पत्नी पहिल्यांदाच बोलली
Rajpal Yadav Wife Reaction: अभिनेता राजपाल यादव हा काही दिवसांपासून चेक बाउन्स प्रकरणामुळे मोठ्या चर्चेत आहे. सध्या हा अभिनेता आर्थिक अडचणीत सापडलाय. चेक बाऊन्सचं हे प्रकरण २०१० सालचं आहे. राजपाल यादवने त्याचा पहिला दिग्दर्शित चित्रपट 'अता पता लापता' बनवण्यासाठी एका खासगी कंपनीकडून सुमारे ५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. यानंतर कर्ज फेडण्यास उशीर झाला आणि दिलेले चेक बाऊन्स झाले. त्यामुळे अभिनेत्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला. या प्रकरणी अभिनेत्यावर चेक बाउन्स झाल्याबद्दल आणि पैसे परत न केल्याच्या आरोपाखाली केस दाखल करण्यात आली. ही बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्स त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.आता पहिल्यांदाच त्याची पत्नी राधा यादव यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
'अता पता लापता' या चित्रपटासाठी घेतलेलं कर्ज फेडता न आल्यामुळे अभिनेत्याने तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केलं. अलिकडेच पीटीआय सोबत संवाद साधताना राधा यादव म्हणाल्या की, "या कठीण काळात संपूर्ण इंडस्ट्रीने आम्हाला खूप पाठिंबा दिला. सगळेच आमच्या पाठीशी ठामपमणे उभे आहेत. मदतीसाठी पुढे येणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार." या दरम्यान, राजपाल यादवची पत्नी राधा हिने याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आत्मसमर्पण केल्यानंतर राजपाल यादव यांचं विधान व्हायरल झालं होतं. "मी कायद्याचा आदर करणारा नागरिक आहे. मी पळून जाणार नाही. परंतू, सध्या माझ्याकडं खरंच पैसे नाहीत. जर माझ्याकडे पैसे असते तर मी नक्कीच दिले असते. मी कोणाची फसवणूक करण्यासाठी हे केलं नाही." असं अभिनेत्याने सांगितलं होतं. त्यानंतर सोनू सूद हे सर्वात आधी पुढे आला आणि त्यांना मदत केली आणि त्यांनी इंडस्ट्रीतील सर्व लोकांना एकत्र येऊन अभिनेत्याला मदत करण्याचं भावनिक आवाहन केलं. यानंतर, संपूर्ण बॉलिवूड अभिनेत्यासाठी एकवटलं.